मुंबई: ‘राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत, असं सुनावतानाच, ‘तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल,’ असा खोचक सल्ला शिवसेनेनं राज्यातील विरोधकांना दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा (CM Uddhav Thackeray) यांनी नुकताच सहकुटुंब अयोध्या दौरा केला आणि श्रीरामाचं दर्शन घेतलं. त्यांच्या या अयोध्यावारीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी टीका केली होती. तसंच, आमची छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील, असा टोला त्यांनी शिवसेनेला हाणला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’तून () आज जोरदार उत्तर देण्यात आलंय. पाटील यांनी चांदमियांची उपमा देण्यात आली असून त्यांनी छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.

वाचा:

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

>> उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या यात्रेमुळं महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावले आहेत. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर फालतू टीका-टिपणी सुरू केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहेत.

>> राज्यात फडणवीसांचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा मोठा फौजफाटा घेऊन अयोध्येस जाऊन आले, दर्शन घेतले होते तसेच शरयूच्या तीरी त्यावेळी भव्य महाआरती केली होती. तोपर्यंत ठाकरे हे हिंदुत्ववादी होते. आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करीत आहेत.

>> उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. सरकारमधील पक्षांच्या विचारधारा वेगळ्या असतीलही, पण लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणे, सगळ्यांना समान न्याय देणे हा मानवता धर्म म्हणजेच राजधर्म असतो. त्या राजधर्माचे पालन श्रीरामाने केले. तोच राजधर्म महाराष्ट्रात चालवला जात आहे.

वाचा:

>> उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत, काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही याच पोटदुखीने राज्यातील विरोधक बेजार झाले आहेत. दिल्लीप्रमाणे नागरिकता कायद्यावर महाराष्ट्रात हिंसा व्हावी असे राज्यातील ठाकरे विरोधकांना वाटत होते, पण उद्धव ठाकरे यांनी राज्यात साधी ठिणगीही पडू दिली नाही. ही सर्व वाडवडिलांची पुण्याई, छत्रपतींचे आशीर्वाद आणि श्रीरामाचा प्रसाद आहे.

>> चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहीत!

>> चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. या विषात राम कसा नांदेल? हा साधा प्रश्न आहे.

>> शिवसेनेने भाजपचा त्याग केलाय, हिंदुत्वाचा नाही, या एका ठोशाने उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचेच दात घशात घातले. हा ठोसा मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जागा निवडली ती अयोध्येची. अयोध्या म्हणजे कुणा एखाद्याची मक्तेदारी नाही. कुणी सरकार स्थापनेसाठी इकडे गेला काय, किंवा तिकडे गेला काय? रामावर ज्यांची श्रद्धा त्या सगळ्यांचीच अयोध्या.

>> कैकयीमुळे श्रीराम वनवासात गेले, पण तिचा पुत्र भरत हा रामभक्त होता. तशी विचारधारा कुठलीही असली तरी ती रामभक्तीआड येऊ शकत नाही. पुन्हा फक्त वाल्याचे वाल्मीकी बनविण्याचे वॉशिंग मशीन राजकारणात आणले म्हणजे ‘रामायण’ समजले असे होत नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here