रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांचे कुटूंब यंदा दिवाळी आनंदाने साजरी करु शकले नाही. मुलांना कपडे, फटाके घेण्याचे दूरच शाळेची फी सुद्धा वेळेत देता येत नाही. दापोली शहरात भाड्याचे घर परवडत नसल्याने १५ किमी वर लांब वाकवली येथे अनेक चालक वाहकांची कुटूंब भाड्याने राहतात. येथील रूम भाडेही आम्ही गेले काही महिने दिलेले नाही. या कुटुंबाच्या मुलांनीही व्यथा मांडल्या आहेत.

ऐन दिवाळीत सिलेंडर संपला तोही आणायला घरात पैसे नव्हते शेजारी जाऊन स्वयंपाक करण्याची वेळ आली अशी मन सुन्न करणारी व्यथा एसटी कर्मचाऱ्याच्या एका गृहिणीने मांडली. ही सगळी कुटूंब नोकरीसाठी आपल्या मुळ गावापासून हजारो मैलावर कोकणात राहतात. गावाला आई वडीलांना पैसे देणे दुरच आमच्या दैंनंदीन गरजाही या मिळणाऱ्या पगारात भागत नाहीत, अशी व्यथा या कुटूंबानी ‘मटा ऑनलाइन’जवळ बोलताना मांडली आहे.
एसटी संप: महामंडळाच्या अवमान याचिकेवर हायकोर्टाचा ‘हा’ आदेश
महामंडळाच्या अवमान याचिकेवर हायकोर्टाचा ‘हा’ आदेश

दरम्यान, न्यायालयाचा आदेश झुगारून संप (MSRTC Strike) करणारी कामगार संघटना व संपकरी कामगारांच्या विरोधात एसटी महामंडळानं दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज सुनावणी झाली. सुनावणी अंती उच्च न्यायालयानं प्रतिवादींना शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी दिवाळीच्या आधीपासून संप पुकारला आहे. न्यायालयानं बंदी आदेश जारी करून व नंतर राज्य सरकारनं मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करूनही संपकरी कामगार मागे हटायला तयार नाहीत. त्यामुळं एसटी महामंडळानं महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना, या संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि तब्बल ३४० जणांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. ‘या सर्वांनी औद्योगिक न्यायालयाचा २९ ऑक्टोबरचा आदेश आणि मुंबई हायकोर्टाचे ३ नोव्हेंबर व ८ नोव्हेंबरचे आदेश यांचा भंग करून संप केला आहे. त्यांच्या विरोधात न्यायालय अवमान कायद्याखालील तरतुदीअन्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती महामंडळानं अॅड. जी. एस. हेगडे यांच्या मार्फत केली आहे.

सामना जिंकून जल्लोष सुरू असताना मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकावणारी घटना

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here