हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील धक्कादायक घटना
  • सासुरवाडीला आलेल्या जावयाची केली सासऱ्याने हत्या
  • मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग होता मनात
  • पोलिसांनी आरोपी सासऱ्याला केली अटक

फर्रुखाबाद: उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दिवाळीत घरी आलेल्या जावयाची त्याच्या सासऱ्याने हत्या केली. त्यानंतर जावयाचा मृतदेह घरात खोदलेल्या खड्ड्यात पुरला. मुलीने प्रेमविवाह केल्याने आरोपी प्रचंड नाराज होता. त्याच रागातून त्याने हे कृत्य केले, असे बोलले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सरह गावातील रहिवासी अंकित नोएडा येथे शिवणकाम करत होता. या ठिकाणी त्याची ओळख फर्रुखाबाद येथील एका मुलीशी झाली. दोघांमध्ये मैत्रीचे बंध जुळले. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांनी दोघांनीही लग्न केले. मुलीच्या घरचे यावर नाराज होते. पतीसोबत राहणारी मुलगी वर्षभर आपल्या माहेरी गेली नाही. मात्र, आता घरच्यांचा राग शांत झाला असेल असे समजून दोघेही दिवाळीच्या कालावधीत घरी जाण्याचा विचार करत होते. त्यानंतर मुलगी पतीला घेऊन माहेरी आली. प्रेमविवाह केल्याचा राग सासरच्या मंडळींच्या मनात होता. अंकित घरी आल्याचे पाहून त्यांनी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह शेजारी कुणीही राहत नसलेल्या एका घरात खड्डा खोदून पुरला. संशय आल्याने पत्नीने आपल्या पतीबाबत घरच्यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मुलीने याबाबत पतीच्या नातेवाइकांना माहिती दिली.

‘या’ जिल्ह्यात ७ दिवसांत ७ हत्या; नागरिकांसह पोलिसांचीही झोप उडाली
‘या’ प्रकरणात आता ईडीच्या रडारवर बॉलिवूडचे आणखी दोन सुपरस्टार

मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. छतावर फुटलेला मोबाइल आणि शेजारील घराजवळ माती दिसून आली. यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, अंकितचा मृतदेह खड्ड्यात पुरलेला दिसला. पोलिसांनी सांगितले की, फतेहगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हैया लाल अवस्थी याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा मुलगा अंकित नोएडात राहत होता. तो काही दिवसांपूर्वी गावात परत आला होता. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी खोदलेल्या खड्ड्यातून अंकितचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटली असून, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मृताचा सासरा आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

‘ते’ व्हिडिओ दाखवून महिलेला ब्लॅकमेल करायचा सरकारी अधिकारी; शरीरसुखाची केली मागणी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here