हायलाइट्स:

  • जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी झालेल्या कारवाईचे पडसाद
  • अहमदनगरमधील खासगी रुग्णालये बंद ठेवण्याची घोषणा
  • प्रशासनाची डोकेदुखी वाढणार

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटना रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवावी आणि आगीच्या घटनेत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहमदनगर शाखेने गुरुवारी बंद पुकारला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन राज्यस्तरावर निषेध नोंदवण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती अहमदनगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी यावेळी दिली.

अहमदनगर आगीच्या तपासात काय आढळले?; पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्याविरोधात मंगळवारी अटकेची कारवाई झाली. त्याचे पडसाद जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य क्षेत्रात उमटले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आग प्रतिबंधक यंत्रणा तातडीने बसवण्याच्या व इतर मागण्यांसाठी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेनं बुधवारी काम बंद आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला पाठिंबा देत डॉ. आठरे यांनी ही घोषणा केली.

तांत्रिक त्रुटी असतानाही थोरातांची शिफारस आणि टोपेंच्या आदेशामुळे झाला ‘हा’ निर्णय

दरम्यान, खासगी रुग्णालये बंद ठेवण्याची घोषणा करताना असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. एस. एस. दीपक, डॉ. पारस कोठारी, डॉ. जयदीप देशमुख आदी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here