मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाची दरवाढ सुरु असल्याने पेट्रोलियम कंपन्यांवर दबाव वाढला आहे. मात्र तूर्त कंपन्यांनी पेट्रोल डिझेल दरांत कोणताही बदल केलेला नाही. सलग सातव्या दिवशी देशातील स्थिर आहेत.

आज गुरुवारी चार प्रमुख महानगरातील पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबईत एक लीटर १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे.

मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये आहे.

केंद्र सरकारने दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांची कपात केली होती. त्यांनतर जवळपास २३ राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे तेथे पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त झाले आहे. केंद्राची शुल्क कपात आणि राज्यांची व्हॅटमध्ये कपात झाल्यामुळे पेट्रोलवरील कर ५० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर डिझेलवरील कराचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

दरम्यान, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर इंधन मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेल खप सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला. गेल्या महिन्यात १७.८७ दशलक्ष टन इंधनाची विक्री झाली. सप्टेंबर २०२१ च्या तुलनेत त्यात १२ टक्के वाढ झाली.

दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा भाव वाढला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव मंगळवारी १.१४ डॉलरने वधारला आणि प्रती बॅरल ८४.७८ डॉलर इतका वाढला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव २.०१ डॉलरने वाढला आणि तो ८४.१५ डॉलर प्रती बॅरल झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here