नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या प्रमाणे ब्रॉडबँड कंपन्या सुद्धा युजर्संना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन ऑफर आणत आहेत. अॅक्ट फायबरनेटने एक भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्संना ३००Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या ऑफरचा फायदा ३१ मार्च २०२० पर्यंत घेता येऊ शकणार आहे. कंपनी यावर कोणताही अतिरिक्त चार्जही लावत नाही. या कंपनीने याआधी अनलिमिटेड ऑफर लाँच केली नव्हती.

कंपनीने या ऑफरची माहिती युजर्संना त्यांच्या इमेलवरून दिली आहे. कंपनीने या ऑफर संदर्भात एक ट्विट केले आहे. या ऑफर सह युजर्संना सध्याच्या प्लानची स्पीड अपग्रेड करण्याची संधी सुद्धा दिली आहे. यासाठी युजर्सला सर्वात आधी प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरमधून ACT फायबरनेटचे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे.

अॅपची लॉगइन केल्यानंतर स्पीडला अपग्रेड करू शकता येते. ही ऑफर देशभरात उपलब्ध आहे. या ऑफरचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात एन्ट्री लेवल प्लानसाठी १०० एमबीपीएसचा स्पीड अपग्रेड दिला आहे. अॅक्ट फायबरनेटने नुकतेच नेटफ्लिक्स सोबत पार्टनरशीप केली आहे. त्यानंतर कंपनीने युजर्संना नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन वर एक्स्ट्रा डेटा आणि मोठा डिस्काउंट देत आहे. कंपनीच्या ACT Blaze प्लानमध्ये युजर्संना 100Mbpsच्या स्पीडने ४५ जीबी डेटा दिला जाणार आहे. तर १०५९ रुपयांच्या या प्लानमध्ये ६ महिने किंवा १ वर्षापर्यंत सब्सक्राइब केल्यानंतर १५०० जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जाणार आहे.

कंपनीच्या दुसऱ्या प्लानविषयी सांगायचे झाल्यास यात ACT स्टॉर्म, ACT लाइटिंग, ACT इंक्रेडिबल आणि ACT गीगा यांचा समावेश आहे. ACT गीगा ब्रॉडबँड प्लानमध्ये १ जीबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. या प्लानला कंपनीने केवळ हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई मध्ये सुरू केले आहे. लवकरच देशातील इतर शहरांतही कंपनी हा प्लान सुरू करणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here