हायलाइट्स:

  • अनैतिक संबंधांतून पत्नीने केली पतीची हत्या
  • प्रियकराच्या मदतीने केले धक्कादायक कृत्य
  • राजस्थानच्या जयपूरमध्ये घटना
  • सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली घटना

जयपूर: धनत्रयोदशीच्या दिवशी जयपूरमध्ये धक्कादायक घटना घडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आले आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. इतकेच नाही तर, हत्येनंतर मृतदेह जमिनीवर आपटला. दोन दिवसांनी बाजारातून मोठी बॅग खरेदी केली आणि त्यात मृतदेह बॅगेसहीत जाळून टाकला. अर्धा जळालेला मृतदेह एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाल्याने ही घटना उघडकीस आली. मारेकरी पत्नी आणि तिच्या प्रियकराला जयपूरच्या करधनी पोलिसांनी अटक केली आहे.

चारित्र्यावर संशय घेत असल्याने खटके उडायचे

जयपूरच्या झोटवाडा येथील रहिवासी मंजू ही प्रियकर पंकज शर्माच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली होती. २०१७ मध्ये पंकज शर्मासोबत ती फिरायलाही गेली होती. त्यावेळी त्याच्यासोबत मंजूने काढलेले फोटो तिचा पती शक्ती सिंह याने मोबाइलमध्ये बघितले होते. त्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत असे. वाद झाल्यानंतर तो तिला मारहाणही करायचा, अशी माहिती मिळाली आहे. दररोजची भांडणे आणि मारहाणीला वैतागून मंजूने प्रेमात अडथळा बनू पाहणाऱ्या पतीची हत्या करण्याचा कट आखला होता, असे सांगण्यात येते.

गुजरातमध्ये ८८ कोटींचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक, समुद्रीमार्गे आणलं जात होतं ‘विष’
नवविवाहितेने केला दीर आणि सासऱ्यावर गंभीर आरोप; पतीबद्दल खळबळजनक दावा

२ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या रात्री मंजूने पंकज शर्माला फोन करून बोलावून घेतले होते. मध्यरात्रीपर्यंत १७ वर्षीय मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा झोपी जाण्यापर्यंत त्यांनी वाट बघितली. मुले झोपल्यानंतर मंजूने दारूच्या नशेत झोपलेल्या शक्ती सिंहचे हातपाय पकडले आणि पंकजने त्याचा गळा आवळला. त्यानंतर त्याचा मृतदेह एका खोलीत नेऊन आपटला. दोन दिवसांनी मृतदेह बॅगमध्ये भरून निवारू रोडवरील कपड्यांच्या दुकानात नेला. तिथे बॅगसहीत मृतदेह जाळला. अर्धवट जळालेला मृतदेह बॅगसहीत दुपारी निर्जन ठिकाणी नेऊन टाकला. मंजू दुचाकीवरून निघून गेली. तिच्या पाठिमागे तिचा प्रियकर पंकज बसला होता. यावेळी ते दोघेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

९ नोव्हेंबरला मृतदेह सापडला, २४ तासांनी हत्येचा उलगडा

करधनी पोलीस ठाण्याचे प्रभारी बनवारीलाल मीणा यांनी सांगितले की, मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडला होता. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी हे दोघेही त्यात दिसून आले. चौकशी केली असता, झोटवाडा येथील शक्ती सिंह हा सात ते आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घरी जाऊन पाहणी केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रण आणि त्यांच्याकडील दुचाकी यांच्यात साम्य दिसल्याने पोलिसांनी मंजूला ताब्यात घेतली. त्यानंतर या हत्येच्या घटनेची उकल झाली. यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

‘या’ प्रकरणात आता ईडीच्या रडारवर बॉलिवूडचे आणखी दोन सुपरस्टार
‘ते’ व्हिडिओ दाखवून महिलेला ब्लॅकमेल करायचा सरकारी अधिकारी; शरीरसुखाची केली मागणी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here