हायलाइट्स:

  • पुण्यातील दापोडी येथील कब्रस्तानमध्ये धक्कादायक घटना
  • कब्रस्तानमध्ये प्रेमी युगुल गप्पा मारत बसले होते
  • काही वेळाने असं काही घडलं की सुरक्षारक्षकही हादरला

पुणे : पुण्यातील दापोडी परिसरात कब्रस्तानमध्ये गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलाला हटकल्यानं तरुणाने आणि त्याच्या साथीदारांनी सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. बुधवारी ही घटना घडली. या प्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील दापोडी येथील कब्रस्तानात एक प्रेमी युगुल गप्पा मारत बसले होते. दुपारची वेळ होती. त्याचवेळी कब्रस्तानच्या सुरक्षारक्षकाने या प्रेमीयुगुलाला हटकले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्यांना तिथून हाकलून लावले. त्यावेळी ते दोघेही तिथून निघूनही गेले. मात्र, काही वेळानंतर तरुणाने त्याच्या तीन साथीदारांना सोबत आणले. हटकणाऱ्या सुरक्षारक्षकाला त्यांनी मारहाण केली.

गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी पैसे नव्हते, बॉयफ्रेंडनं असं काही केलं की कुटुंब गेलं चक्रावून
पती-पत्नी आणि ‘तो’; महिलेने पतीचे हातपाय बांधले अन् प्रियकरानं…

या मारहाणीत सुरक्षारक्षक आझम खान हे जखमी झाले आहेत. ते दापोडीत राहतात. या प्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्या चौघांवरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान कब्रस्तानात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. बुधवारी दुपारी एक तरुण आणि तरुणी कब्रस्तानमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी खान यांनी या दोघांना हटकले. त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. कब्रस्तानमधून निमूटपणे बाहेर गेलेला तरूण काही वेळाने पुन्हा तिथे आला. त्याच्यासोबत अन्य तिघे जण होते. या चौघांनी खान यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना धमकावले. या चौघांनीही खान यांना मारहाण केली. लाकडी दांडक्याने त्यांच्यावर प्रहार केले. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

गुजरातमध्ये ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त, पाकिस्तानातून समुद्रीमार्गे आणलं जात होतं ‘विष’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here