हायलाइट्स:

  • दिल्लीतील सहायक प्राध्यापकाने घडवून आणली पत्नीची हत्या
  • ड्रायव्हर आणि पुतण्याही हत्येच्या कटात सामील
  • पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर उघडकीस आलं प्रकरण

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी सहाय्यक प्राध्यापकाला त्याच्या पत्नीच्या हत्याप्रकरणात अटक केली आहे. या हत्येत सामील असलेला त्याचा पुतण्या गोविंद आणि ड्रायव्हर राकेशलाही बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरनं मंगळवारी संध्याकाळी एकट्यानेच महिलेची हत्या केली होती. कुणाला संशय येऊ नये म्हणून घटनेच्या वेळी प्राध्यापक विरेंद्र बहाणा करून घराबाहेर गेला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्या प्रकरणात सामील असलेल्या तिन्ही आरोपींकडे वेगवेगळे कारण होते. त्यामुळं तिघांनी मिळून महिलेच्या हत्येचा कट रचला. सहायक प्राध्यापकाची पत्नी आणि विरेंद्र या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. दोन महिन्यांपूर्वी महिलेने पतीविरोधात बुराडी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या हत्येत सामील असलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव गोविंद आहे. तो प्राध्यापकाचा पुतण्या आहेत. या हत्याकांडात तो सामील झाला होता. कारण त्याचे काकावर खूप प्रेम होते. त्याला आपला काका त्रस्त असल्याचे बघवत नव्हते. त्यामुळे तो या कृत्यात सहभागी झाला.

कब्रस्तानमध्ये गप्पा मारत होते प्रेमीयुगुल, इतक्यात तिथं…पुण्यातील धक्कादायक प्रकार

महिलेची हत्या करणारा ड्रायव्हर राकेशची नोकरी तिच्यामुळे गेली होती. त्यामुळे त्याला घरही सोडावे लागले होते. तो गेल्या तीन वर्षांपासून प्राध्यापकाच्या घरी राहत होता. राकेश याने पोलिसांना सांगितले की, तीन वर्षांपूर्वी टॅक्सी चालवाययचा. त्यावेळी त्याची भेट विरेंद्रसोबत झाली. विरेंद्र एका कॉलेजात सहायक प्राध्यापक आहे. विरेंद्र त्याला लहान भाऊ मानायचा. त्याने आपली कारही त्याला दिली. तसेच विरेंद्रने त्याला छतावरील एका खोलीत राहायलाही जागा दिली होती. त्याचे भाडेही तो घेत नव्हता. विरेंद्र त्याला पगारही देत नव्हता. जेव्हा गरज लागेल तेव्हा एकरकमी घेऊन जा, असे विरेंद्रने त्याला सांगितले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये विरेंद्रचे लग्न पिंकीसोबत झाले होते. लग्न होऊन घरी आल्यानंतर तिने राकेशला घराबाहेर काढण्यास सांगितले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. राकेशच्या म्हणण्यानुसार, तो बेरोजगार झाला होता. त्यामुळे पिंकीबद्दल त्याच्या मनात खूप राग होता.

आईसोबत काकाचे होते अनैतिक संबंध; मुलगा आणि जावयानं उचललं भयंकर पाऊल

सूडभावनेने केली हत्या

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने पिंकीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिला शॉकही दिला. हत्या केली त्यावेळी विरेंद्रचे वडीलही घरीच होते. वयस्कर असल्याने त्यांना चालता येत नाही. त्यांना ऐकूही येत नाही. पोलिसांनी केलेल्या चौकशीत राकेशने या घटनेत कुणीही सामील नाही असे सांगितले होते. त्याने कुणाचे नावदेखील घेतले नव्हते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून बघितल्यानंतर राकेशसोबत विरेंद्र आणि गोविंदही दिसून आले. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here