सांगली : राज्यात सर्वत्र एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. याला कुठेतरी गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. सांगलीमध्ये संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने एसटी कर्मचाऱ्यांचे निधन झाले. आज सकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र निवृत्ती पाटील वय ४६ राहणार कवलापूर असं या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सांगलीमध्ये सुद्धा आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला राजेंद्र निवृत्ती पाटील हेदेखील होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झालं.
सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल, भाजपनेही दिला पाठिंबा
एसटी संपाच्या विवंचनेतून ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत पाटील यांच्या मृतदेहावर कवलापूर या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेने राज्य सरकारच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. मृत आर एन पाटील हे १७ वर्षांपासून एसटी सेवेत वाहक म्हणून काम करत होते. एसटी संपाच्या पहिल्या दिवशी ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर ते गेली तीन दिवस आंदोलनाकडे आले नाहीत.

या दरम्यान ते एसटीच्या संपाबाबत सर्व कर्मचारी यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. तर आपल्या नोकरीबाबत ते विवंचनेत होते. एसटीचा संप लांबत चालल्याने पाटील हे तणावात होते. आज सकाळी ते घरीच असताना त्यांना चक्कर आली. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सांगली सिव्हील हॉसेपिटलमध्ये दाखल केले. मात्र त्याठिकाणी त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगली सिव्हीलला धाव घेतली. तसेच मृत वाहक आरएन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मृत पाटील हे एसटी संपामुळे तणावाखाली होते. यातूनच त्यांना त्रास झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

एसटीचा संप लांबत चालल्याने एसटी कर्मचारी तणावाखाली असल्याने आशा घटना यापुढे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने संपावर तोडगा काढावा आणि मृत वाहकाच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी भाजपानेते पृथ्वीराज पवार यांनी केली आहे.

कॉलेजमध्येच विद्यार्थ्याला वार करून संपवलं, मारेकरी अनोळखी होते पण…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here