या कामाचे टेंडर होऊन हे काम २ वर्षात पुर्ण होण्याचे शासनाचे निर्देश असून सुध्दा ५ वर्षे होवुन सुध्दा पाणी पुरवठ्याचे काम पुर्ण झाले नाही. तसेच नविन कनेक्शन मोफत देण्याची तरतुद असुन सुध्दा दोन ते अडीच हजार रुपये प्रत्येकी कनेक्शनला घेतले जात आहे. परिणामी नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागत असल्याने ते वैतागले आहेत. त्यामुळे साजीदभाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी जल समाधी आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचं काम केलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times