हायलाइट्स:
- लातूरमधील रुग्णालयात आगीची घटना
- नवजात बालक अतिदक्षता विभागात आग लागली
- आगीत जीवितहानी नाही
नवजात बालक अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत ही आग विझवली आहे.
कशी लागली आग?
रुग्णालयात देवीच्या फोटोपुढे दिवा लावल्यामुळे काच तडकून काच खाली पडली आणि पेपरला आग लागली. अतिदक्षता विभागात ही आग पसरली आणि त्यानंतर शॉर्टसर्किटमुळे आग आणखीनच वाढल्याचं सांगण्यात येत आहे. या अतिदक्षता विभागात २७ बालके उपचार घेत आहेत. त्यापैकी एक बालक व्हेंटिलेटरवर आहे. या सर्व बालकांना कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत इतरत्र हलवून होणारा अनर्थ टळला.
दरम्यान, अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या आग दुर्घटनेत अनेक रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेला एक आठवडाही पूर्ण झालेला नसतानाच दुसरी घटना घडल्याने रुग्णालयातच रुग्ण सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times