हायलाइट्स:

  • प्रवाशांच्या सोयीसाठी शिवशाही बसेस सुरू करण्याचा निर्णय
  • महामार्ग बस स्थानकावर अज्ञात व्यक्तींनी बसवर केली दगडफेक
  • शिवशाही बसच्या काचा फुटल्या

नाशिक : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला (ST Bus Strike) पर्याय म्हणून प्रशासनाने गुरूवारी भाडेतत्वावरील शिवशाही बसेस (Shivshahi Bus) सुरू करण्याचा निर्णय घेतला. सांयकाळच्या सुमारास या बसेस ठक्कर बाजार बस स्थानकातून पोलीस बंदोबस्तात पुणे आणि धुळे मार्गावर मार्गस्थ झाल्या आहेत. मात्र, महामार्ग बस स्थानकावर पोलीस नसल्याने अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यामुळे महामार्ग बस स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसच्या काचा फुटल्या आहेत.

ऐन दिवाळीच्या सुट्टीत एसटी महामंडळ कर्मचारी अघोषीत संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड आर्थिक लूट होत असून, मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. या संपाला पर्याय म्हणून एसटी महामंडळ प्रशासनाने शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या मालकीच्या ४० तर, खासगी मालकांच्या ६० टक्के शिवशाही बसेस सध्या राज्यात चालतात. त्यातील खासगी बस व्यवस्थापकांना बसेस सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Nawab Malik: ‘ते नेते भाजपमध्ये गेल्यावर…’; राष्ट्रवादी थेट ईडी कार्यालयात जाऊन विचारणार जाब

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी शिवशाहीच्या माध्यमातून सेवा देण्याच्या निर्णयाच्या अंमलबाजवणीला प्रारंभ झाला. संप काळात पहिल्यांदाच धावलेल्या नाशिक-पुणे शिवशाही बसमध्ये २५ प्रवाशांनी प्रवास केला. एसटी महामंडळाकडून शिंदेगाव टोलनाक्यापर्यंत सुरक्षा पुरवण्यात आली होती. नाशिक-धुळे या शिवशाहीला प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचं चित्र होतं. एसटी महामंडळाच्या सुचनेनुसार कमी प्रवाशांसह शिवशाही धुळ्यासाठी मार्गस्थ करण्यात आली. बसस्थानकामधील अनुचित प्रकार टाळण्यासाठी दोन्ही शिवशाहीला पोलिसांनी सुरक्षा पुरविली होती. पुणे आणि धुळेपर्यंत थेट पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने खासगी शिवशाही व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली.

varun gandhi’s swipe at kangana ranaut : कंगना राणावतच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावरून भडकले वरुण गांधी; म्हणाले…

पोलीस नसल्याने फोडल्या काचा

ठक्कर बाजार येथे पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता. त्यामुळे येथून दोन्ही बस मार्गस्थ झाल्या. मात्र, महामार्ग बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त उपलब्ध नव्हता. हा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी दोन शिवशाही बसेसवर दगडफेक केली. त्यात, एका बसची मागची काच फुटली तर, दुसऱ्या बसच्या इंडीकेटरचं नुकसान झालं. यामुळे खासगी शिवशाही चालकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेबाबत बोलताना खासगी शिवशाही बस पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या प्रसन्ना टुर्सचे व्यवस्थापनक सुभाष शेळके यांनी सांगितलं की, आमच्या ७ ते ८ बसेस महामार्ग बस स्थानकात उभ्या होत्या. तेथे आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी थेट दगडफेक केली. यात दोन बसेसचं नुकसान झालं. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचं काम सुरू आहे.

‘आमच्या ३० बसेस असून, गुरूवारी सांयकाळी सहा वाजता दोन बसेस पुणे येथे तर, दोन बसेस नाशिकमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, प्रवासादरम्यान काही झाल्यास काय? असा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांनी संपूर्ण मार्गावर बंदोबस्त द्यावा, अशी आमची मागणी आहे. रस्त्यात मध्येच काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी कोणाची? असा प्रश्न अनुत्तीर्ण आहे,’ अशी प्रतिक्रिया खासगी शिवशाही बसचे व्यवस्थापक सुभाष शेळके यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here