हायलाइट्स:

  • अहमदनगर जिल्ह्यातील पशुपालक चिंताग्रस्त
  • १५ दिवसात एकट्या तिळापूर गावात ४५ हून अधिक जनावरांचा मृत्यू
  • तीन गाईंच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात लाळसदृश्य आजाराने अनेक पाळीव जनावरांचे बळी गेल्याची घटना घडली आहे. गेल्या १५ दिवसात एकट्या तिळापूर गावात ४५ हून अधिक गायींसह, वासरे, शेळ्या आणि बोकड या पाळीव प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर जनावरांचा मृत्यू होत असून तेही हतबल झाले आहेत.

ऐन दिवाळीत पशुपालक शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. मोठ्या कष्टाने सांभाळलेली जनावरे डोळ्यासमोर जीव सोडत असल्याने या परिसरातील पशुपालक धास्तावले आहेत.

congress mla son : धक्कादायक… काँग्रेस आमदाराच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या!

तिळापूर गावातील अनेक शेतकऱ्यांच्या गाई दगावल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूग्ध व्यवसाय हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे गाईंचे गोठे आहेत. मात्र गावात गाईंच्या मृत्यूचे तांडव सुरू आहे. तसंच अनेक शेतकऱ्यांच्या गाई गंभीर आजारी असल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

बस स्थानकावर राष्ट्रवादीचं नाव घेऊन खासगी एजंटने केला बनाव; मात्र…

जिल्हा पशुसंवर्धक उपायुक्त सुनील तुंबारे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह तिळापूर गावात भेट दिली. लाळसदृश्य हा आजार असून आजाराचे नेमकं निदान व्हावं यासाठी तीन गाईंच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here