हायलाइट्स:

  • जामनेर तालुक्यात प्रेमीयुगुलाची
  • तासाभराच्या अंतराने संपवलं जीवन
  • धक्कादायक घटनेनं गावात खळबळ

जळगाव : जामनेर तालुक्यातील कुंभारी गावातील अल्पवयीन तरुण व तरुणीने तासाभराच्या अंतराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय असल्याने त्या दृष्टीने तपास सुरू आहे. पवन जाधव (वय १७) व तानिया चव्हाण (वय १६) अशी मृत युवक व युवतीची नावे आहेत.

जामनेर तालुक्यातील कुंभार तांडा या गावातील तानिया चव्हाण या १६ वर्षीय अल्पवयीन युवतीने मंगळवारी घरात कोणी नसताना दुपारी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. आई-वडील घरी आल्यानतंर सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनतंर अवघ्या तासाभराच्या अंतराने गावातीलच १७ वर्षीय युवक पवन जाधव याने देखील शेतात जावून विष प्राशन करुन आत्महत्या केली. युवकाचा मृतदेह शेतातच रात्रभर पडून होता. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारी या युवकाचा मृतदेह शेतात आढळून आला.

जिल्हा बँक निवडणुकीत कॉग्रेसचा अभिमन्यू केला; जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांचा राष्ट्रवादीवर आरोप

मुलाच्या संदेशातून माहिती समोर

मृत तरुण व तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते अशी गावात चर्चा आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या वेगवेगळ्या ठिकाणी केली असल्याने याबाबतची माहिती पोलिसांनाही नव्हती. तसंच मृतांचे कुटुंबीय किंवा गावातील पोलीस पाटील यांनी त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती पोलिसांना दिलेली नव्हती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गावात जाऊन तपास केला. मुलाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. या मुलीच्या मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संदेश पवन याने त्याच्या काकाला पाठवला असल्याची माहिती समोर आल्याने आता आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याच्या संशयानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here