अहमदनगर: स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या बद्दलच्या वक्तव्यामुळं वादात सापडलेल्या अभिनेते यांच्या गाडीची काच अज्ञातांनी फोडल्याचं समोर आलं आहे. पोंक्षे यांच्यावरील रागातून हा प्रकार घडला नाही ना, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, चोरीच्या उद्देशानं कुणीतरी हा प्रकार केला असल्याचं सीसीटीव्ही फूटेजच्या तपासणीतून स्पष्ट झालं आहे.

वाचा:

नगरच्या मनमाड मार्गावरील श्रद्धा हॉटेलसमोर साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. नगर येथे येत्या १ ते ३ दरम्यान १०० वं नाट्यसंमेलन होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी पोंक्षे व मध्यवर्ती नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषद घेतली. तिथून परत निघण्यासाठी गाडीजवळ आले असता त्यांच्या गाडीची काच फोडल्याचे लक्षात आले. तेथे अनेक गाड्या असताना केवळ पोंक्षे यांच्याच गाडीची काच का फोडली गेली, यावरून चर्चेला तोंड फुटले. रस्त्यावरचा एखादा दगड दुसऱ्या वाहनांमुळे उडून काचेला लागला असावा असंही बोललं जात आहे. यानंतर पोंक्षे हे दुसऱ्या गाडीने निघून गेले तर कांबळी यांनी गाडी नाट्य परिषदेच्या स्थानिक कलावंतासोबत त्यांची गाडी दुरुस्तीसाठी पाठवली.

पोलिसांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी सावरकर यांची तुलना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली होती. त्या रागातून कोणी हे कृत्य केले काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोंक्षे घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर पोलीस तिथं पोहोचले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरू केलं आहे. या प्रकरणी अद्याप कोणाच्याही विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here