हायलाइट्स:

  • कन्नूर – बंगळुरू एक्सप्रेसवर अचानक कोसळले दगड
  • माहितीनुसार, रेल्वेतून २३४८ प्रवासी प्रवास करत होते
  • रेल्वे चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं टळला मोठा अपघात

बंगळुरू : कर्नाटकात शुक्रवारी सकाळी सुदैवानं एक मोठा रेल्वे अपघात होता होता टळला. धावत्या कन्नूर – बंगळुरू एक्सप्रेसवर अचानक वरतून दगड कोसळल्यानंतर रेल्वेचे पाच डबे रुळावरून घसरले. रेल्वेच्या छतावर दगड कोसळू लागल्यानंतर तब्बल अडीच हजार प्रवाशांचा श्वासच अडकला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, टोपपुरू – सिवदी दरम्यान ही घटना घडलीय. दक्षिण – पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सर्वच जवळपास २३४८ स्थलांतरित सुरक्षित आहेत. कुणीही प्रवासी यामुळे जखमी झाल्याची सूचना मिळालेली नाही.

UP Elections: पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं वचन, अन्नपूर्णेची मूर्ती कॅनडातून भारतात
varun gandhi’s swipe at kangana ranaut : कंगना राणावतच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावरून भडकले वरुण गांधी; म्हणाले…
कन्नूर – बंगळुरू एक्सप्रेस आज पहाटे ३.५० मिनिटांनी टोपपुरू – सिवदी भागातून प्रवास करत असताना डोंगराळ भागातून भूस्खलनामुळे अचानक रेल्वेच्या छतावर दगड कोसळू लागले. यामुळे प्रवासी धास्तावले. मात्र, काही कळायच्या आधीच रेल्वेचे पाच डबे रुळावरून घसरल्यानं प्रवाशांना हादरा बसला.

रेल्वे चालकानं प्रसंगावधान दाखवत तत्काळ ट्रेन रोखली त्यामुळे मोठा अपघात होता होता राहिला. या घटनेची सूचना मिळताच दक्षिण पश्चिम रेल्वेचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे रुळाजवळून दगड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं.

पहाटे ३.५० च्या सुमारास ही घटना घडली तेव्हा अनेक प्रवासी निद्रावस्थेत होते. अपघातानंतर रेल्वेत एकच गोंधळ उडाला… प्रवाशांच्या आरडा-ओरड्याचा आवाज ऐकू आला. मात्र, प्रवाशांना गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागल्याची माहिती नाही.

india china news : ‘बेकायदेशीर कब्जा केलेल्या जमिनीवर चीनचे बांधकाम, अजिबात मान्य नाही’, भारताने सुनावले खडे बोल
UP Elections: ५० वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आलेल्या ‘हिंदू-बंगाली’ कुटुंबांना यूपीत मिळणार हक्काची जमीन

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here