‘एडीआर’च्या अहवालानुसार, ४२६.२३ कोटी रुपये इलेक्टोरल बाँडमधून आले, तर अंदाजे पाच कोटी रुपये ऐच्छिक देणगीतून जमा झाले. देणग्यांच्या प्राप्तिकर विभागाकडे नोंदविलेल्या तपशीलानुसार मोठ्या प्रमाणावर स्रोत अज्ञात आहेत. सध्याच्या काळात २० हजार रुपयांपेक्षा कमी निधी कोणाकडून आला हे जाहीर करणे राजकीय पक्षांना बंधनकारक नाही. त्यामुळे हे सर्व स्रोत अज्ञात म्हणून संबोधण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा कोठून आला याची कोणतीही नोंद अधिकृत उपलब्ध नाही. आम आदमी पक्ष, लोकजनशक्ती पक्ष, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांनी जाहीर केलेल्या ऑडिट रिपोर्टमधील तपशील एकूण देणग्यांपेक्षा वेगळे आहेत, असेही हा अहवाल सांगतो. २०१९-२० या आर्थिक वर्षांत प्रादेशिक पक्षांना मोठ्या प्रमाणावर पैसा मिळाला. त्यांच्या एकूण उत्पन्नातील ५५.५० टक्के वाटा अज्ञात स्रोतातून आला होता.
पक्षांनी जाहीर केलेले उत्पन्न (रुपयांत)
– तेलंगण राष्ट्रसमिती : ८९.१५ कोटी
– तेलुगु देसम : ८१.६९ कोट
– वायएसआर काँग्रेस : ७४.७५ कोटी
– बिजू जनता दल : ५०.५८ कोटी
– द्रमुक : ४५.५० कोटा
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times