नवी मुंबई: ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तयार केलेल्या शॅडो कॅबिनेटचा पैशांशी काहीही संबंध नाही. सरकारच्या चुकीच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट बनवलं आहे. या जबाबदारीचा चुकीचा वापर करू नका. ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकू नका,’ असा इशारा मनसे अध्यक्ष यांनी आज पक्षाच्या नवनियुक्त प्रति मंत्रिमंडळाला दिला.

वाचा:

मनसेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा मेळावा झाला. या मेळाव्यातच पक्षाच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. त्यानंतर बोलताना राज यांनी यामागची भूमिका मांडली. ‘राज्याच्या विविध प्रश्नांशी व समाजघटकांशी संबंधित ही खाती आहेत. कोणालाही आपण मंत्री झालो असं वाटू नये म्हणून एका खात्याची जबाबदारी अनेकांना देण्यात आली आहे, असं राज म्हणाले. ‘ही खाती सांभाळताना सरकारच्या चुका दाखवाच, पण सरकारकडून एखादं चांगलं काम झाल्यास त्यांचं अभिनंदनही करा, असं राज यांनी सांगितलं.

वाचा:

मनसेसोबत इतके लोक कसे?

मनसेच्या कार्यकर्त्यांना राज यांनी यावेळी धीर देण्याचा प्रयत्न केला. ‘पराभव होत असतात. देशावर ५० ते ६० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसचीही आज वाईट स्थिती आहे. दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. २०१४ मध्ये मायावतींच्या पक्षाचा एकही खासदार निवडून आला नाही. राजकीय लाटांमध्ये अशा गोष्टी घडतात. पण प्रश्न फक्त आम्हालाच विचारले जातात. लोकांना काम करणारे हवे आहेत का हेच कधी-कधी कळत नाही,’ असं राज म्हणाले. ‘सततच्या अपयशानंतरही मनसेकडं इतक्या मोठ्या संख्येनं लोक कसे आहेत, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं, यातच सर्वकाही आलं,’ असं राज म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here