नवी दिल्ली : करोना विषाणूचा डेल्टा व्हेरियंट हाच चिंतेचा विषय असून, भारतातील ‘सिक्वेन्सिंग’मध्ये करोनाचे इतर व्हेरियंट आता फारसे चिंतेचे राहिलेले नाहीत, असे प्रतिपादन ‘इंडियन सार्स-कोव्ह-२ जेनॉमिक्स कन्सॉर्टियम’ने (इन्साकॉग) म्हटले आहे. जगामधील परिस्थितीतही बदल झालेला नसल्याचे ‘इन्साकॉग’ने म्हटले आहे.

‘डेल्टा बी.१.६१७.२ (एवाय) आणि एवाय.एक्स जगभरात चिंतेचे व्हेरियंट आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार इतर व्हेरियंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंट अनेक देशांत आढळून येत आहे. ‘डब्ल्यूएचओ’ जगभरातून देण्यात येणाऱ्या सिक्वेन्सिंगच्या माहितीमध्ये डेल्टाखेरीज इतर व्हेरियंटचा प्रभाव देशांमध्ये कमी होताना दिसत आहे. डेल्टा व्हेरियंटच चिंतेचे मुख्य कारण आहे.’ भारतामधील ‘सिक्वेन्सिंग’मधून डेल्टाखेरीज इतर कुठलाही व्हेरियंट चिंतेचे कारण असल्याचे दिसलेले नाही, असे सांगण्यात आले. गेल्या ऑक्टोबरमध्ये डेल्टा व्हेरियंट भारतामध्ये आढळून आला. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात करोना साथ मोठ्या प्रमाणात होती. ‘इन्साकॉग’ हे २८ राष्ट्रीय प्रयोगशाळांचा समूह आहे. डिसेंबर २०२०मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत त्याचे काम चालते.

यूपी निवडणूक: ‘मुलगा आहे, पण लढू शकत नाही…’ स्मृती इराणीचा गांधी कुटुंबावर निशाणा
UP Police: ‘२.५ फूट उंचीच्या नळाला लोंबकळून पाच फुटी व्यक्ती आत्महत्या कसा करू शकतो?’

‘३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण’

दरम्यान, ‘करोना गेलेला नाही. रशिया आणि चीनसह शेजारी देशांमध्ये प्रादुर्भाव काय़म आहे. शिवाय लस घेतल्यामुळे आम्ही सुरक्षित झालो असा अर्थ होत नाही. लस हे कवच आहे. करोनाशी लढण्यासाठी लशीचे दोन डोस घेण्याव्यतिरिक्त मास्क आणि हात स्वच्छ धुण्यासह करोनानियम पाळावेच लागतील. भारतात पुरेशा प्रमाणात लशी असून, ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य गाठायचेच आहे’, असा निर्धार केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी व्यक्त केला.

टाइम्स वृत्त समूहाच्या दुसऱ्या ‘टाइम्स नाऊ’ शिखर परिषद २०२१मध्ये दुसऱ्या व शेटवच्या दिवशी मांडविया बोलत होते. आरोग्य क्षेत्रात देशाला कशाप्रकारची सज्जता करावी लागेल याचा धडा करोनाच्या दुसऱ्या लाटेने दिला. त्यादृष्टीने परिवर्तन करण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि योजना हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सर्वच राज्यांकडे लशींचा भरपूर साठा असून, प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीने मेहनत करीत आहे. भारताच्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या करोनाप्रतिबंधक लशींना जगातील ९७ देशांनी मान्यता दिली आहे. जगातील गरीब देशांना आम्ही स्वस्त लस उपलब्ध करून देत आहोत. भारताची आवश्यकता पूर्ण झाली असेल तर आपण जगाला मदत केली पाहिजे, अशी पंतप्रधान मोदींची धारणा आहे. भारत लशींच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला असून, आता पाच-सहा विदेशी कंपन्या भारतात येऊन लशीचे उत्पादन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Karnataka: प्रवासी गाढ निद्रेत असतानाच धावत्या एक्सप्रेसवर कोसळले दगड, ५ डबे रुळावरून घसरले
UP Elections: पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं वचन, अन्नपूर्णेची मूर्ती कॅनडातून भारतात
करोना अंतिम टप्प्यात

‘करोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात असून, लढाई पूर्ण संपल्याशिवाय उपाययोजनांमध्ये ढिलाई दाखविता येणार नाही,’ असा इशारा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी गुरुवारी दिला. लसीकरण वाढविण्यावर भर देण्याचा आग्रह राज्यांना करतानाच १२ कोटी पात्र नागरिकांनी लशीचा दुसरा डोस लवकरात लवकर घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत त्यांनी ऑनलाइन संवाद साधला. महाराष्ट्रासह केरळ, उत्तराखंड, झारखंड, मिझोराम, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, गोवा, गुजरात, आसाम, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थिती लावली. या संवादामध्ये करोनाविरोधातील लढाई अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्राच्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेदरम्यान राज्यांतील नागरिकांचा पहिला डोस घेऊन झाला असेल, याची हमी द्यावी, असे आवाहन त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले. मंडावीया म्हणाले, ‘करोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरण आणि करोनासंबंधीचे नियम (सुरक्षित वावर, मास्क घालणे) ही दोन शस्त्रे आपले संरक्षण करतील. करोनाची लढाई संपेपर्यंत यामध्ये ढिलाई येता कामा नये. देशभरात ७९ टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे आणि ३८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.’

१३ हजार नवे रुग्ण

गुरुवारी, देशात दिवसभरात १३ हजार ९१ नव्या करोनारुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ४४ लाख १ हजार ६७०वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांमधील घट कायम असून ही संख्या १ लाख ३८ हजार ५५६वर आली आहे. हा २६६ दिवसांतील नीचांक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. २४ तासांत ३४० करोनारुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या ०.४० टक्के आहे. ही मार्च, २०२०पासूनची सर्वांत कमी टक्केवारी आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२५ टक्के नोंदवण्यात आले असून, हे मार्च २०२०पासूनचे सर्वाधिक प्रमाण आहे. दैनंदिन संक्रमण दर १.१० टक्के, तर आठवड्याचा संक्रमण दर १.१८ टक्के आहे. मृत्युदर १.३४ टक्के नोंदवला गेला.

india china news : ‘बेकायदेशीर कब्जा केलेल्या जमिनीवर चीनचे बांधकाम, अजिबात मान्य नाही’, भारताने सुनावले खडे बोल
Tripura Violence: वकील,पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांवरचा UAPA रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here