हायलाइट्स:
- तरूण चौघींना एकाच वेळी करायचा डेट
- माहिती मिळताच, चारही गर्लफ्रेंड तरूणाच्या घरी धडकल्या
- वाद झाल्यानंतर तरूणाने केला आत्महत्येचा प्रयत्न
- पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये घटनेची जोरदार चर्चा
वृत्तानुसार, कूचबिहारच्या जोरपटकी गावात एका मेडिकल दुकानात काम करणाऱ्या तरूणाच्या घरी एकाच वेळी त्याच्या चार गर्लफ्रेंड आल्या होत्या. हा तरूण या चौघींना डेट करत होता. एकाच वेळी चौघींना डेट करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एकमेकींशी संपर्क साधून त्याच्या घरी आल्या होत्या. तरूण घरी पोहोचल्यानंतर त्याला मोठा धक्काच बसला. चौघींनी त्याच्या घरासमोर गोंधळ घातला. यामुळे तो तरूण घरात गेला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी या तरूणाला माथाभंगा रुग्णालयात नेले. त्यानंतर तेथून कूचबिहार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, उपचार घेणाऱ्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे त्याच्या चारही गर्लफ्रेंडने त्याच्याविरोधात पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे याबाबत ठोस माहिती पोलीस देऊ शकलेले नाहीत. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूण धोक्याच्या बाहेर आहे. मात्र, त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
एकाच वेळी चौघींना करायचा डेट
तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तरूणाविरोधात कुणीही तक्रार केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरूण एकाच वेळी चौघींनाही डेट करत होता. याबाबतची माहिती या चौघींनाही मिळाली. त्यावेळी त्यांनी एकमेकींशी संपर्क साधला. त्यानंतर त्याच्या घरी एकत्र जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्या चौघी त्याच्या घरी पोहोचल्या. त्याच्या घरासमोरच चौघींनी गोंधळ घातला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. वाद इतका टोकाला गेला की, तरूणाने घरात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times