हायलाइट्स:

  • आर्यन खानचा आज २४ वा वाढदिवस
  • सुहाना खानसह चुलत बहिण भावांनी सोशल मीडियावर आर्यनला दिल्या शुभेच्छा
  • सुहानाने लहानपणीचा फोटो केला शेअर

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा आज २४ वा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वी आर्यन आणि त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात मोठे वादळ आले होते. त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये खूपच उलथापालथ झाली होती. परंतु हे वादळ हळूहळू शमत चालले आहे. त्यामुळे आर्यन आता त्याचे नव्याने आयुष्य सुरू करत आहे. त्यामुळे हा वाढदिवस आर्यनसाठी खास आहे. आर्यनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची सख्खी बहिण सुहाना आणि चुलत बहीण आलिया छिबा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


सुहानाने शेअर केला जुना फोटो

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या आपल्या शिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. मात्र ती सतत सोशल मीडियावर सक्रीय असते. आपल्या लाडक्या भावाच्या वाढदिवसानिमित्ताने एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आर्यन, सुहाना आणि त्यांची चुलत बहीण आलिया छिबा दिसत आहे. या फोटोमध्ये आर्यन, सुहाना आणि आलियाच्या लहानपणीचा फोटो आहे. सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुहाना - आर्यन

या फोटोमध्ये चिमुरडी सुहाना आणि आलिया छोट्याशा ढकलगाडीवर बसलेल्या आहेत. तर आर्यन खान त्याचा भाऊ अर्जुन छिबासोबत उभा आहे. या फोटोमध्ये हे चौघेजण लहान आहेत. हा फोटो पाहून चाहते फारच खुश झाले आहेत. सुहानाचा हा फोटो आलिया आणि अर्जुन यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोवर युझर्स भरभरून कमेन्ट करत आहेत.


शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खानला एका हायप्रोफाइल क्रूझवरील रेव्ह पार्टीमधून ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर ७ जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. तब्बल २५ दिवसांनंतर म्हणजेच २८ ऑक्टोबरला आर्यन खानचा सशर्त जामीन मंजूर होऊन त्याची मुक्तता झाली आहे.Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here