हायलाइट्स:
- पैशाने भरलेली बॅग पळवून नेली
- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील घटना
- घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण
मार्केट कमिटीच्या जवळील एका खाद्य तेल कंपनीमधून कंपनीच्या मालकाचा मुलगा सायंकाळी पैशाची बॅग घेऊन कंपनी शेजारीच असलेल्या घराच्या गेटजवळ आला. त्यावेळी समोरच काट्यात दबा धरून बसलेल्या चोरांनी पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून चोर बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
सदरील घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
दरम्यान, या घटनेत मुलास कुठलीही इजा झालेली नाही. घटनेबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली आणि तात्काळ तपासाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना सूचना करून परिसरात नाकाबंदीसाठी रवाना केले. यावेळी घटनास्थळी नागरिक तसंच व्यापारी मोठ्या संख्येने जमा झाले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times