वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

‘हिंदुत्वाविषयीचा द्वेष काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात जन्मजात भिनला आहे,’ असा पलटवार भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शुक्रवारी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदुत्वाबाबतच्या विधानावर टीका करताना भाजपने काँग्रेसला हिंदुत्वावरून लक्ष्य केले.

सलमान खुर्शीद, शशी थरूर, पी. चिदंबरम हे नेते जाणूनबुजून हिंदू धर्माला बदनाम करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप द्वेषाची विचारसरणी पसरवतात,’ हा आरोपही पात्रा यांनी खोडून काढला. हिंदू धर्मातील नागरिकांना विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचेही भाजपने म्हटले आहे.

goa election : गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार, CM पदासाठी सावंत पहिली पसंतीः सर्वेचा अंदाज
up election 2022 : उत्तर प्रदेशात कोणाची सत्ता येणार? काय सांगतो निवडणूकपूर्व सर्वे? वाचा…
uttarakhand election : उत्तराखंडमध्ये भाजपची अग्निपरीक्षा; CM म्हणून रावत यांना पहिली पसंती: सर्वे

पात्रा म्हणाले, ‘हिंदुत्वाबाबत बेजबाबदार विधाने करणे हा राहुल गांधींचा इतिहास आहेच; पण ती त्यांची संस्कृती आहे. संधी शोधून गांधी कुटुंब हिंदुत्वाला लक्ष्य करते आणि बदनाम करते. हिंदू पाकिस्तान, हिंदू तालिबान, हिंदू दहशतवाद असे शब्द थरूर, चिदंबरम ही मंडळी मुद्दाम वापरतात. दिग्विजयसिंह आणि मणिशंकर अय्यरही असाच हिंदूंबाबत अपप्रचार करतात. या सर्व वक्तव्यांना राहुल गांधी यांचाही पाठिंबा असतो. हिंदुत्वाबद्दल बोलायचे हे जन्मजातच आहे. गांधी कुटुंबाच्या रक्तातच हिंदूंबद्धलचा द्वेष भरला आहे. सलमान खुर्शीद हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. हिंदुत्वाची तुलना बोको हराम किंवा आयसिससोबत करतात, थरूर हिंदू तालिबान म्हणतात. दिग्विजयसिंहही वाट्टेल ते बरळतात. त्यामागे कोणतीही विचारसरणी नाही. मुद्दामहून हिंदूना लक्ष्य केले जाते.’

Madhya Pradesh: ‘हिंदू’ हेच ‘काँग्रेस स्लीपर सेल’चं टार्गेट, गृहमंत्र्यांचा वादग्रस्त दावा
यूपी निवडणूक: ‘मुलगा आहे, पण लढू शकत नाही…’ स्मृती इराणीचा गांधी कुटुंबावर निशाणा

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here