त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजातील लोकांवर हल्ले करून मशिदीची तोडफोड करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून अमरावतीत मुस्लिम समाजातील लोकांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाला गालबोट लागलं होतं व हिंसक वळन आलं. गाड्या व २० ते २५ दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे अमरावती शहरात लूटमार, तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली असा आरोप भाजपने केला. यावेळी पोलीस यंत्रणा मूकदर्शक बनली होती.
संपूर्ण अमरावती शहर प्रचंड दहशतीत होते. शहराला वाचवण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आला. या मुस्लिम मोर्चाचा निषेध म्हणून आज अमरावती शहर बंदचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आले असून उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील भाजप काढणार आहे व दुकाने तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे.
नांदेडमध्येही बंदच्या आवाहनाला शुक्रवारी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. बळजबरीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न काहींकडून करण्यात आला, त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times