अमरावती : गेल्या महिन्यात त्रिपुरातील हिंसाचाराचा वनवा आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. आजही राज्यात अमरावतीमध्ये हिंसाचार सुरू आहे. अमरावतीमध्ये राजकमल चौकात भाजपसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. राजकमल चौकात कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे. त्यासाठी पोलिसांकडूनही लाठीचार्ज करण्यात आला. इतकंच नाहीतर अजूनही मोठ्या प्रमाणात आंदोलन तिथे जमत आहे. त्यामुळे गर्दी होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

नागपूरचे डीआयजी संदीप पाटील हे स्वतः देखील रस्त्यावर उतरून आंदोलकांना आवरण्याचं काम करत आहे. या सगळ्या परिस्थिती संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी माध्यमांनी चर्चा केली असता त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाहीतर ज्यांनी कोणी लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं त्यांच्यावर कठोर कारवाई होणार, त्यांना माफी मिळणार नाही असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून त्या दृष्टिकोनातून पोलिसांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांशी देखील यासंबंधी चर्चा झाली आहे ते सर्व राजकीय नेत्यांशी बोलून त्यांनासुद्धा हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन करणार आहेत. दरम्यान, हे आंदोलन करून त्याला हिंसक वळण देऊन काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे जनतेने आंदोलन शांततेत करावं असं आवाहनही यावेळी वळसे-पाटील यांनी केलं.

अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण! आंदोलकांकडून दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज
मोठ्या प्रमाणात आंदोलक असल्यामुळे पोलिसांची ताकद कुठेतरी कमी पडत आहे. यामुळे अधिक पोलिस बंदोबस्त करण्यात यावा अशा सूचनाही गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. खरंतर, अमरावतीच्या या हिंसक वळण यामागे काही राजकीय नेत्यांचा किंवा पक्षाचा, संघटनेचा हात आहे का? असा प्रश्न विचारला असता जर असं काही असेल तर त्यावर कठोर चौकशी होईल. याबद्दल अधिक तपास केला जाईल आणि चुकी असणाऱ्याला कठोर शिक्षाही करण्यात येईल असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण देण्यात आलं. काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यामागे एका राजकीय पक्षाचा हातही असतो ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. राजकीय पक्षाचा असा फायदा घेणे हे योग्य नाही सगळ्यांनी समजून घेत शांततेत आंदोलन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या घटनेचा खरंतर आज निषेध व्यक्त करण्याची काही गरज नव्हती. कारण या घटनेला आधीच बरेच दिवस उलटून गेले आहेत. पण काही समाजकंटकांनी हे बंद सुरू असताना दगडफेक केले. यावेळी लोकांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे का? असं विचारलं असता यावर कठोर चौकशी करण्यात येणार असून आरोपींवर किंवा दोषींवर कारवाई केली जाईल असेही वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

Tripura Effect In Maharashtra: महाराष्ट्रातील सध्याच्या तणावामागे भाजपच; संजय राऊतांनी जोडला ‘या’ संघटनेशी संबंध

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here