हायलाइट्स:
- दिल्ली पोलिसांनी उभारला ग्रीन कॉरिडोर
- चंदीगड ते दिल्ली… ४० मिनिटांत
- दिल्ली विमानतळ ते एम्स रुग्णालयात पोहचण्यासाठी लागले केवळ २० मिनिटे
दिल्ली ट्राफिक पोलिसांनी उभारलेल्या ग्रीन कॉरिडोरमुळे एक जिवंत हृदय दिल्लीच्या ‘इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा’पासून ते एम्स रुग्णालयापर्यंत जवळपास १६ किलोमीटरच्या अंतरावर अवघ्या २० मिनिटांत पोहचवणं शक्य झालं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडहून सायंकाळी ४.२० मिनिटांनी हवाईमार्गानं हे हृदय दिल्लीपर्यंत पोहचलं. त्यानंतर हे हृदय विमानतळापासून रुग्णालयापर्यंत पोहचवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आला होता.
‘एम्स’च्या ‘ऑर्गन रिट्रीव्हल बँकिंग ऑर्गनायझेशन’ (ORBO) विभाग प्रमुखांकडून सूचना मिळाल्यानंतर ताबडतोब हालचाली करत दिल्ली पोलिसांनी दिल्ली विमानतळाच्या ‘टर्मिनल ३’ पासून ‘एम्स’ रुग्णालयापर्यंत विशेष व्यवस्था उभारली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सामान्य मार्गानं याच मार्गानं प्रवास करण्यासाठी जवळपास एक तासांचा वेळ लागतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times