मुंबई: खिलाडी अश्रय कुमारचा आगागी चित्रपट ‘सुर्यवंशी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटात अक्षयसोबत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री देखील दिसणार आहे. चित्रपट प्रदर्शित होताना वाद होणं नवं नाही. असाच एक वाद चित्रपटामुळं निर्माण झाला आहे. या वादाचं कारण आहे ते म्हणजे रोहित शेट्टीनं केलेलं एक विधान. रोहितनं कतरिनाबद्द केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळं कतरिनाचे चाहते भडकले असून रोहित शेट्टीविरोधात सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला आहे.

चित्रपच्या प्रमोशन दरम्यान एका कार्यक्रमात शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगताना रोहितनं हे विधान केलं आहे. चित्रपटातील एका दृश्यात अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. हे दृश्याचं चित्रीकरण करतानाचा हा किस्सा आहे. या दृश्यात स्फोट दाखवण्यात आले असून कतरिना कैफही दिसत आहे. या दृश्यात कतरिनाचे डोळे बंद होते. पण तिला पुन्हा या दृश्याचा टेक घ्यायचा होता. पण रोहितनं पुन्हा टेक घेण्यास नकार दिला आणि म्हणाला की, तसंही तुला कोण बघणार आहे?. रोहितच्या या उत्तरानं कतरिना देखीला निराश झाली होती. पण काही वेळानं त्यानं तिची समजूत काढली.

रोहितनं केलेलं हे वक्तव्य त्याला चांगलंच महागात पडलं असून तिच्या चाहत्यांकडून ट्विटरवर ‘shame on ’ ट्रेंडिंग होत आहे. या विरोधामुळं चित्रपटाला काही प्रमाणत नुकसान होण्याची शक्यता आहे. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच कतरिना कैफ देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सूर्यवंशी’च्या टीझरमध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंह हे दोघंही दिसले होते. तसंच गुलशन ग्रोवर, अभिमन्यु सिंह, जॅकी श्रॉफ आणि विवियन भटेना यांच्या देखील चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

अभिनेता सिद्धार्थ जाधवदेखील ‘सूर्यवंशी’मध्ये
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतीक्षित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत आहेच. त्याला साथ देण्यासाठी बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि सिम्बा रणवीरसिंग हेसुद्धा आहेत. आणखी एक खूशखबर म्हणजे सिम्बाचा साथीदार संतोष तावडे, अर्थात आपला लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवदेखील ‘सूर्यवंशी’ सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सिद्धूचे चाहते पुन्हा एकदा त्याला खाकी वर्दीत पाहणार आहेत. सिम्बा आणि तावडे यांनी एकत्र काय धमाल केलीय ते आता बघू या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here