हायलाइट्स:
- या अभिनेत्याला जुही चावलाशी करायचे होते लग्न
- वडिलांनी नकार दिल्यामुळे जुही होऊ शकली नाही मिसेस खान
- जुही चावलाचा आज ५४ वा वाढदिवस

जुही चावलाने बॉलिवूडमधील तीनही खान यांच्यासोबत काम केले आहे. अनेक सिनेमांत तिने पाहुणी कलाकार म्हणूनही काम केले होते. त्यामध्ये ‘दिवाना मस्ताना’ या सिनेमात जुही चावला आणि सलमान खान यांचे लग्न झाल्याचे दाखवण्यात आले होते. मोठ्या पडद्यावर या दोघांचे लग्न जरी झाले तरी खऱ्या आयुष्यात या दोघांचे लग्न करण्याची इच्छा मात्र अपुरी राहिली. हे वाचून आश्चर्य वाटले ना.. परंतु हे खरे आहे. सलमानला जुहीसोबत लग्न करायचे होते.
त्या सुमारास सलमानने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘जुही ही खूपच गोड आहे. मी तिच्या वडिलांना विचारले होते की जुहीशी लग्न करू शकतो का? परंतु त्यांनी नकार दिला. कदाचित मी त्यांना आवडलो नसेन. माहिती नाही त्यांना त्यांच्या लेकीसाठी कशाप्रकारचा मुलगा हवा होता ते…’

त्यानंतर जुही चावलाने १९९७ मध्ये उद्योगपती जय मेहता यांच्याशी लग्न केले. जय हे जुहीपेक्षा सात वर्षांनी मोठे होते. जुहीची जर इच्छा असती तर तिच्यासोबत काम करणाऱ्या कोणत्याही कलाकारासोबत ती लग्न करू शकली असती. परंतु तिने सिनेक्षेत्राशी संबंध नसलेल्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारले. जय मेहता आणि जुही चावला यांची भेट राकेश रोशन यांनी घडवून आणली होती.
जुहीने १९८६ मध्ये सल्तनत या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोन वर्षांनी तिने ‘कयामत से कयामत तक’ या ब्लॉकबस्टर सिनेमात काम केले. या सिनेमात तिच्यासोबत आमिर खान होता. या सिनेमामुळे जुही एका रात्रीत प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री झाली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times