विनोबांचे धाकटे बंधू बाळकोबा भावे यांच्याशी चर्चा करून व त्यांच्या संमतीने त्यांनी इब्राहिम काझी यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला. सारस्वत ब्राह्मण व मुस्लीम धर्मीय असा हा १९५७ सालचा विवाह. लग्नापूर्वी व लग्नानंतर त्यांना जे जे सोसावे लागले त्याचे वर्णन त्यांच्या ‘शमा… न विझणारी’ या आत्मचरित्रात करण्यात आलं आहे.
विनोबा, बाळकोबा भावे, साने गुरुजी यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. सात रस्ता येथे सानेगुरुजींच्या ‘साधना प्रेस’ला लागूनच त्यांची खोली होती. हे त्यांचे घर म्हणजे सर्वोदयी कार्यकर्त्यांसाठी मुक्तद्वार होते. सर्वोदय संमेलनात व १९७५ साली विनोबांच्या मौनमुक्ती संमेलनालाही त्या उपस्थित राहिल्या होत्या. शमा काझी यांचा विनोबा जन्मस्थानाशी जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे.
शमा काझी यांच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा आहे. ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते उन्मेष बागवे हे त्यांचे जावई होत. कन्या किरण राजपूत व यास्मिन बागवे या विनोबा जन्मस्थानाशी संबंध ठेऊन आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times