हायलाइट्स:

  • कोंढव्यातील एका जेष्ठ व्यक्तीला ५ लाख ४ हजार रुपयांचा गंडा
  • बँक खात्याला पॅन क्रमांक जोडण्याच्या बहाण्याने फसवणूक
  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पुणे : बँक खात्याला पॅन क्रमांक जोडण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने कोंढव्यातील एका जेष्ठ व्यक्तीला ५ लाख ४ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पुणे क्राईम ताज्या बातम्या अपडेट)

याबाबत ५७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारक व्यक्तीच्या विरुद्ध आयटी अ‍ॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा जाहिरात एजन्सीजचा व्यवसाय आहे. सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून तुमचे खाते बंद होणार असून, तुम्ही तत्काळ पॅन क्रमांक अपडेट करून घ्या, असा मेसेज पाठवला होता.

Pravin Darekar: पवारांच्या ‘त्या’ भाषणाची क्लिप माझ्याकडे आहे!; एसटी संपावर दरेकर आक्रमक

तक्रारदार यांना हा मेसेज बँकेतून आला असावा, असं वाटल्यामुळे त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून सायबर चोरटा सांगेल त्या प्रमाणे प्रक्रिया केली. काही वेळातच तक्रारदार यांच्या बँक खात्याचा ताबा चोरट्याने घेऊन त्यांच्या खात्यातून ५ लाख ४ हजार ३४२ रुपये आपल्या खात्यात वर्ग करून घेतले. खात्यातून पैसे कमी झाल्याचा मेसेज येताच फसवणूक झाल्याचं लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.

Sameer Khan Case: नवाब मलिक यांच्या जावयाच्या अडचणी वाढणार?; NCBचा कोर्टात अर्ज

दरम्यान, याप्रकरणी तपास करून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी कोंढवा पोलिसांकडे पाठवलं आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here