हायलाइट्स:

  • सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली
  • चार दिवसापासून सुरू आहे अन्नत्याग आंदोलन
  • सदर कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

सोलापूर : आपल्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग केलेल्या सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मनोज मुदलियार असं या कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सोडण्यास नकार दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलं आहे.

कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू: कुटुंबाने केला गंभीर आरोप; निलंबनाच्या भीतीने…

सोलापुरी एसटी कर्मचारी मनोज मुदलियार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. चार दिवसापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली असून एसटीचे वरिष्ठ आधिकारी आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढत आहेत. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा तिढा वाढतच चालला आहे.

दरम्यान, शनिवारी आंदोलनकर्ते मुदलियार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. मुदलीयार यांच्यासोबत एसटीचे अनेक कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वाहतूक नियंत्रक विलास राठोड, आगार व्यवस्थापक कुलकर्णी यांनी समजण्याचा प्रयत्न केला, मात्र मुदलियार हे ऐकणास तयार नसल्याचं दिसून आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here