हायलाइट्स:
- दोन महिला पोलिसांना धक्काबुक्की
- कारवाई केल्याच्या रागातून केलं कृत्य
- दाम्पत्याला शाहूनगर पोलिसांनी केली अटक
कुंभारवाडा जंक्शन या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक कॉन्स्टेबल जयश्री पेखळे यांनी २९ ऑक्टोबर रोजी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या उमर शेख याच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. पेखळे या कॉन्स्टेबल पुलेकर यांच्यासोबत शुक्रवारी पुन्हा नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई करत होत्या. यावेळी उमर शेख आणि त्याची पत्नी याठिकाणी पोहचली.
पेखळे आणि पुलेकर या कारवाई करत असताना शेख आणि त्याची पत्नी दोघांचे मोबाईलवर फोटो आणि चित्रफित काढू लागले. यावर हटकताच शेख याच्या पत्नीने पेखळे यांना धक्काबुक्की केली. याचवेळी शेख याचा मित्र प्रिन्सिस गोविंद जगले त्या ठिकाणी आला आणि फोटो, व्हिडिओ पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवर अपलोड करण्याची धमकी देऊ लागला.
दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून शेख आणि त्याच्या पत्नीला शाहूनगर पोलिसांनी अटक केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times