अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचलपूर तालुक्यात आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. अमरावती शहरांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी उपविभागीय अधिकारी आदेश जारी कळत संपूर्ण उपविभागात कलम १४४ लागू केली.

याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट प्रमोद सिंह गड्रेल यांनी शहर बंदचे आवाहन केले होते. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासनाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष यांसह इतर महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अभय माथने रुपेश लहाने श्यामसिंह गड्रेल प्रमोद गड्रेल आदींचा समावेश आहे. स्थानबद्ध करण्यात आलेल्या या नेत्यांना काही तासापूर्वी अमरावती येथे हलविण्यात आले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत बड्या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, कोण राखणार राजकारणात वजन?
अतिसंवेदनशील तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपूर शहरात सध्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी तळ ठोकला आहे. भारतीय जनता पार्टीच्यावतीने बंद व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व दुकाने बंद ठेवण्याचे कडकडीत आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे करोनानंतर प्रथमच अचलपुर परतवाडा शहरातील रस्ते हे निर्मनुष्य झाले आहेत.

वाढत्या तणावामुळे अमरावतीमध्ये संचारबंदी लागू, ३ दिवस इंटरनेट सेवाही राहणार बंद

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here