दरम्यान, गडचिरोलीत काल सकाळी ग्यारापत्तीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली होती. धानोरा तालुक्यात मुरुम गावाजवळील जंगलामध्ये नक्षलवादी मोठ्या प्रमाणात लपून बसले होते. पोलीस गस्तीवर आले असल्याची माहिती मिळाली. हे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधून आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नक्षलवादी विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. याच दरम्यान जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.
या चकमकीत पोलीस जवानांनी नक्षलवाद्यांचा हल्ला परतवून लावला. दिवसभर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये जवानांनी मोठ्या हिंमतीने लढा देत २६ माओवाद्यांना ठार केले आहे. काल सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या कारवाईत मृतक माओवाद्यांची संख्या २६ झाल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले आहे.तर,या चकमकीत ४ जवान जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरदिनटोला जंगलात काल सकाळपासून ही चकमक सुरू होती. घनदाट जंगल असल्याने सॅटेलाईट फोनवरुन पोलीस मुख्यालय संपर्क करत होते.कसनासुर बोरीयाच्या चकमकीत २०१८ मध्ये ४० नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतरची ही मोठी कारवाई आहे. आज नक्षल्यांचे मृतदेह जिल्हा मुख्यालयात आणणार असून त्यांची ओळख पाठविले जाणार आहे. सायंकाळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे पत्रकार परिषदेतून याबाबत अधिकृत माहिती देणार असल्याचे कळविले.
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे ?
– ५० लाख रुपयांचा इनाम असलेला नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता.
– मावोवादी सर्वोच्च सेंट्रल कमिटीचा सदस्य.
– एलगर परिषदेतील फरार आरोपी.
– एल्गारमधील कारावासात असलेला दुसरा आरोपी डॉक्टर आनंद तेलतुंबडेचा भाऊ.
– पश्चिम भारताचे काम ज्यात महाराष्ट्र मुख्य ह्याचा प्रभारी.
– जंगल आणि अर्बन क्षेत्रातील दोन्हीवर कामाचा अधिकार.
– एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीला झोन याने विकसित केला आहे.
– अँजेला सोनटक्के ही त्याची पत्नी. ही सुद्धा मावोवादी म्हणून पकडली गेली होती.
– मिलिंद हा वणी – राजुरा परिसरात लहानाचा मोठा झालेला.
– शहरी भागात मावोवादी संघटनांमध्ये दलित समाजातील तरुणांना भरती करण्याचे विशेष लक्ष.
– शस्त्र ट्रेनिंग देणे, ऑपरेशनला मान्यता देणे अशी जबाबदारी मिलिंद तेलतुंबडे सांभाळायचं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times