हायलाइट्स:

  • नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार उघड
  • बिल्डर पती महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा पत्नीला संशय
  • पत्नीने साथीदारांच्या मदतीने पतीचे केले अपहरण
  • बांधकाम साइटवर कारमध्ये कोंबले

नवी मुंबई : न्हावा शेवा पोलिसांनी नुकतीच एका तामिळनाडूच्या महिलेला अटक केली आहे. अलगू मीनाक्षी (वय ४०) असे या महिलेचे नाव आहे. पती विजयराजन (वय ४६) असे अपहरण झालेल्या पतीचे नाव असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. सीवूड्समध्ये त्यांचे कार्यालय आहे. महिलेने आपल्या सात साथीदारांच्या मदतीने त्यांचे अपहरण केले होते. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

न्हावा शेवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याचे घटस्फोट प्रकरण तामिळनाडूमध्ये न्यायप्रविष्ट आहे. पतीचे नवी मुंबईत अन्य एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मिनाक्षीला होता. त्यावरून तिने बिल्डर पतीचे अपहरण करण्याचा कट रचला. पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण करणे आणि अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. २७ ऑक्टोबर रोजी मीनाक्षी आणि तिचे अन्य साथीदार कारने नवी मुंबईत आले. तिने एका महिलेला ग्राहक बनवून पतीच्या कार्यालयात पाठवले. घर बघण्याचा बहाणा करून ती गेली होती. विजयराजन यांनी त्यांना उलवे भागातील खारखोपर येथील दोन प्रोजेक्टच्या ठिकाणी नेले. दरम्यान त्याचवेळी मीनाक्षी आणि तिचे अन्य पाच साथीदार त्यांचा पाठलाग करत होते. प्रोजेक्ट साइटवर त्यांनी विजयराजन यांना कारमध्ये कोंबून त्यांचे अपहरण केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Viral Video : देवाच्या पाया पडला, नंतर दानपेटी चोरी केली; ठाण्यातील मंदिरातील चोरी CCTVमध्ये कैद

विजयराजन हे संपूर्ण दिवस कार्यालयात परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील इतर कर्मचारी चिंतेत पडले. काहीतरी विपरीत घडलंय अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. त्यांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. त्यांचा मोबाइल फोन ट्रॅक केला. त्यांचा शेवटचा ठावठिकाणा पणजी होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तिकडे पथक रवाना केले. पोलीस कलंगुट येथे पोहोचले, पण त्यापूर्वीच आरोपी तेथून निसटले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लोकेशन दाखवत होते. पोलीस कणकवलीत पोहोचले. आरोपींची कार एका पेट्रोल पंपावर दिसून आली. त्यांनी मीनाक्षी आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेतले आणि बिल्डरची सुटका केली. इतर महिला साथीदारांना उलवे येथे अटक केली.

कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संताप; अजमेर, जोधपूर, सिरोहीत तक्रारी दाखल

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here