नवी दिल्लीः चीननंतर करोनाचा सर्वाधिक कहर इराणमध्ये दिसून येतोय. इराणमध्ये गेल्या २४ तासांत करोनामुळे ४३ जणांचा मृत्यू झालाय. यामुळे करोनाने इराणमधील मृतांची संख्या २३७वर गेलीय. याशिवाय ७,१६१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यापर्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हवाई दलाचं सी-१७ ग्लोबमास्टर हे विमान पाठवण्यात आलंय. रात्री नऊ वाजता या विमानाने उड्डाण घेतलं.

सी-१७ ग्लोबमास्टर इराणला रवाना

सी-१७ ग्लोबमास्टर हे हवाई दलाचं विमान रात्री वाजता इरणला रवाना झालं. इराणध्ये किमान २ हजार भारतीय आहेत. करोनामुळे ते अडकले आहेत. तीन दिवसांपूर्वीच ३०० भारतीयांच्या लाळेचे नमुने इराणमधून भारतात आणण्यात आलेत. भारतीयांची करोना व्हायरसची तपासणी केंद्रीय आरोग्य मंत्रालय इराणमध्ये करणार होतं. तिथे प्रयोगशाळाही स्थापन करण्यात येणार होती. मात्र, नंतर ही योजना रद्द करण्यात आली.

इराणमध्ये करोनाचे २३७ बळी

तेहरानमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळून आलेत. १९४५ एवढे रुग्ण एकट्या तेहराणमध्ये आहेत. तर संपूर्ण इराणमध्ये आणखी ५९५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. इराणमध्ये करोनाच्या मृतांची संख्या २३७ वर गेलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here