हायलाइट्स:

  • दिल्ली विमानतळावर दोन महिला ड्रग्ज तस्करांना पकडले
  • युगांडातील महिला दिल्ली विमानतळावर उतरताच घेतली झडती
  • ९० कोटी रुपयांचे हेरॉइन केले जप्त
  • कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनी केली कारवाई

नवी दिल्ली: कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडाच्या दोन महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडील ९० कोटी रुपये किंमतीचे हेरॉइन जप्त केले आहे. या दोन्ही महिला तस्कर मेडिकल टुरिस्ट बनून भारतात आल्या होत्या.

या कारवाईसंबंधी अधिकाऱ्यांनी शनिवारी अधिकृत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, १२ आणि १३ नोव्हेंबरच्या रात्री अबुधाबीमार्गे नैरोबीहून त्या भारतात आल्या होत्या. त्यांच्याकडे १२.९ किलो हेरॉइन सापडली आहे. अधिकाऱ्यांनी हेरॉइन जप्त केली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे ९० कोटी रुपये इतकी आहे.

Viral Video : देवाच्या पाया पडला, नंतर दानपेटी चोरी केली; ठाण्यातील मंदिरातील चोरी CCTVमध्ये कैद

अंमली पदार्थांसह पकडल्या गेलेल्या या तस्कर युगांडा, केनिया आणि भारतासह अनेक देशांत गेल्या होत्या. हेरॉइन त्यांनी आपल्याकडील सुटकेसमध्ये लपवून ठेवले होते. त्यासाठी सुटकेसमध्ये खास जागा तयार केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या श्वान पथकातील श्वानांमुळे या महिला तस्कर अधिकाऱ्यांच्या हाती लागल्या.

कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संताप; अजमेर, जोधपूर, सिरोहीत तक्रारी दाखल

एनसीबीची मोठी कारवाई, ४ कोटींचे हेरॉइन जप्त

अलीकडेच, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबई आंतरराष्ट्रीय टर्मिनल आणि सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून चार कोटी रुपये किंमतीचे हेरॉइन जप्त केले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात गुजरातमधील वडोदरा येथील एका नागरिकाला नोटिस बजावली असून, तपास करण्यात येत आहे. एनसीबीने गुजरातच्या वडोदरा येथील एका व्यक्तीचा जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणात पुढील चौकशी करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here