हायलाइट्स:

  • संपत्तीच्या वादातून जन्मदात्या पित्याची मुलीने केली हत्या
  • घटस्फोटीत मुलगी अनेक महिन्यांपासून माहेरी राहायची
  • पश्चिम बंगालमधील हुगली येथील धक्कादायक घटना

हुगली: बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पश्चिम बंगालच्या हुगळी येथे घडली आहे. घटस्फोटानंतर आपल्या वडिलांच्या घरी राहणाऱ्या मुलीनेच आपल्या पित्याची निर्घृण हत्या केली. मृत वडील हे रेल्वे सेवेतून निवृत्त झाले होते. संपत्तीवरून वाद झाला आणि त्यातून तिने आपल्या पित्याची हत्या केली.

हुगलीच्या उत्तरपाडा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच आपल्या जन्मदात्या पित्याची शनिवारी हत्या केली. कालीपदो दास (वय ६२) असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. ते रेल्वे सेवेतून निवृत्त झाले होते. कालीपदोची मुलगी केया दास ही घटस्फोटीत होती. घटस्फोटानंतर ती पित्याच्या घरी राहायची. कालीपदो यांना एकुलता एक मुलगाही आहे. त्यांच्यासोबत ती राहायची.

मेडिकल टुरिस्ट बनून ‘त्या’ दोघी विमानतळावर उतरल्या; ९० कोटींचे ड्रग्ज सापडले
धक्कादायक! बिल्डर नवऱ्याच्या अफेअरचा संशय; बायकोनं असं काय केलं की सगळेच झाले अवाक्…

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. तिची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मारेकरी मुलीचे आपल्या वडिलांसोबत संपत्तीवरून वाद सुरू होते. त्यामुळे त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढला होता. त्यानंतर हा वाद टोकाला गेला आणि पोटच्या मुलीनेच वडिलांची हत्या केली. त्यांचा मुलगा हा घटना घडल्यानंतर फरार झाला आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटस्फोट झाल्यानंतर मुलगी आपल्या वडिलांसोबत राहत होती. बापलेकीमध्ये नेहमी भांडणे होत होती. संपत्तीवरून त्यांच्यात खटके उडत होते. शनिवारी वाद विकोपाला गेला आणि तिने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली असून, तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Viral Video : देवाच्या पाया पडला, नंतर दानपेटी चोरी केली; ठाण्यातील मंदिरातील चोरी CCTVमध्ये कैदकंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संताप; अजमेर, जोधपूर, सिरोहीत तक्रारी दाखल

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here