हायलाइट्स:
- विदेशातील तरूणी भारतात येऊन चालवायच्या सेक्स रॅकेट
- दोघी तरूणींसह तिघांना केली पोलिसांनी अटक
- एका रात्रीच्या सोबतीसाठी घ्यायच्या प्रत्येकी २० हजार रुपये
- दिल्ली पोलिसांनी सापळा रचून केली अटक
उजबेकिस्तान येथून भारतात आलेल्या अनुक्रमे २४ वर्षीय आणि २८ वर्षीय तरुणी महिपालपूरमध्ये राहत होत्या. या दोघी तरूणी सेक्स रॅकेट चालवत होत्या. या दोघींना दिल्लीच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यासोबत कॅब ड्रायव्हर पुरन सिंह यालाही अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, काही विदेशी तरूणी सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. याचा तपास केला असता, मोनू नावाचा एजंट विदेशी तरूणींना देहव्यापारासाठी घेऊन येत असल्याची ठोस माहिती हाती लागली.
सापळा रचून केली अटक
मोनू या एजंटकडे तीन-चार विदेशी तरुणी पुरवण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. त्यावेळी एक तरूणी एका रात्रीसाठी २० ते २५ हजार रुपये घेत असल्याचे एजंटने सांगितले होते. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने एक पथक तयार केले. ठरल्यानुसार, रोहिणीच्या सेक्टर १५ मध्ये एका कॅबमध्ये दोन तरूणी तिथे आल्या होत्या. त्या दोघीही उजबेकिस्तानच्या असल्याची माहिती मिळाली. दोघींनी २०-२० हजार रुपयांची मागणी केली. पोलिसांनी या दोघी तरुणींना पकडले.
कॅब ड्रायव्हरने कमिशन स्वरुपात प्रत्येकी दोन हजार रुपये घेतले होते. पोलिसांनी त्यालाही अटक केली. गुन्हा नोंदवल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली आहे. चौकशी केली असता, दोन्ही तरूणी या भारतात टुरिस्ट व्हिसावर आल्या होत्या. या ठिकाणी त्या मुदत उलटून गेली तरी, राहत होत्या. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांनी पैसे कमावण्याचे साधन म्हणून देहव्यापार करण्यास सुरुवात केली होती.
चार पाच महिन्यांपासून तरुणी पुरवणाऱ्या रमेशच्या संपर्कात होतो. तो ग्राहकांपर्यंत तरुणींना सोडण्यासाठी जात होता, अशी माहिती कॅब ड्रायव्हर पुरनने पोलिसांना दिली. पोलीस आता या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणार आहेत. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times