हायलाइट्स:

  • भाजप युवा मोर्चाच्या नेत्याचा मृतदेह कारमध्ये आढळला
  • झारखंडमधील पलामू येथील धक्कादायक घटना
  • भाजप कार्यकर्त्यामध्ये संताप, आरोपींच्या अटकेची मागणी
  • आदल्या रात्री १२ वाजता आला होता फोन, हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर झाले बेपत्ता

डालटनगंज: झारखंडमध्ये भाजपच्या युवा नेत्याची हत्या करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा कोषाध्यक्ष सुमित श्रीवास्तव (वय २५) यांचा मृतदेह कारमध्ये आढळला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९८ वर डालटनगंज-औरंगाबाद मुख्य रस्त्यावर रविवारी सकाळी हरिहरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक आरोग्य केंद्राजवळ एका वळणावर ही कार उभी होती. या घटनेची माहिती मिळताच, भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तर श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भाजप युवा मोर्चाचे नेता श्रीवास्तव हे हरिहरगंज येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहा वाजता कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित जेवण केलं. त्यानंतर नेहमीप्रमाणे सुमित आपल्या लहान भावासोबत घरापासून १०० मीटरवर असलेल्या स्वतःच्या हॉटेलात झोपण्यासाठी गेले. हॉटेलमध्ये असताना रात्री बाराच्या सुमारास सुमित यांना एक फोन आला. त्यानंतर त्याबाबत आपल्या लहान भावाला सांगून हॉटेलमधून निघून गेले. मात्र, ते परतलेच नाहीत.

२२ वर्षीय पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ता ४ दिवसांपासून होता बेपत्ता, अखेर…

रविवारी पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही लोकांनी सुमित श्रीवास्तव त्यांच्या कारमध्ये दिसून आले. कार आतमधून लॉक होती. शंका आल्याने काही जणांनी याबाबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कळवले. सर्व जण त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सुमीत यांना कारमधून बाहेर काढले आणि जवळच्याच रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सुमित यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. सुमित यांची हत्या दुसऱ्याच ठिकाणी केली असून, त्यांचा मृतदेह कारमध्ये लॉक करून मारेकऱ्यांनी पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. शनिवारी रात्री १२ वाजता ज्या व्यक्तीसोबत फोनवर सुमित यांचे बोलणे झाले, त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. कुटुंबीयांकडूनही माहिती घेतली जात आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्या विदेशी तरूणी; सेक्स रॅकेट चालवायच्या, असा झाला भंडाफोड

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here