द्वारे लेखक कुलदीप जाधव | द्वारा संपादित सुनील तांबे | महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अपडेट केले: 14 नोव्हेंबर 2021, संध्याकाळी 4:26
हडपसरमधील साडेसतरानळी येथील एका डेकोरेशनच्या सामानाच्या एका गोदामाला भीषण आग लागली. पहाटे तीन वाजता लागलेल्या या भीषण आगीत आगीत गोदामातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हा कर्मचारी हे दोन्ही पायांनी अपंग होता.

हडपसरमध्ये भीषण आग्नितांडव, एका अपंग कर्मचाऱ्याचा मृत्यू
हायलाइट्स:
- साडेसतरानळी येथील एका डेकोरेशनच्या सामानाच्या गोदामाला भीषण आग.
- आगीत एका अपंग कर्मचाऱ्याचा मृत्यू.
- आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश.
हे गोदाम लोकवस्तीमध्ये असल्याने ही आग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तासांमध्ये आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाच्या चार आगीच्या बंबाने अथक परिश्रमानंतर ही आग विझवली आहे. घटनास्थळी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस व पीएमआरडी व अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख शिवाजी चव्हाण उपस्थित होते.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times