हायलाइट्स:

  • पुण्यातील भोसरी येथील ज्वेलर्समध्ये चोरी
  • महिलेने सोन्याचे ब्रेसलेट हातचलाखीने लांबवले
  • सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाला महिलेचा प्रताप
  • भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे: ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका महिलेची हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पकडली. ज्वेलर्समधील कामगाराचे लक्ष विचलित करून महिलेने दुकानातील सोन्याचे ब्रेसलेट लांबवले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर महिलेचा प्रताप उघडकीस आला आहे. पुण्यातील आळंदी रोड येथील भोसरी येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात महिलेने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भोसरी येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका महिलेने कामगाराला बोलण्यात गुंतवून तेथील सोन्याचे ब्रेसलेट लांबवले. साडेसव्वीस हजार रुपये किंमतीचे ब्रेसलेट चोरून ती पसार झाली. शुक्रवारी (ता.१२ ) ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी विरेंद्र मेहता यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Uttar Pradesh : ऊसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत सापडला मुलीचा मृतदेह, गँगरेपनंतर हत्येचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, मेहता हे त्यांच्या ज्वेलर्सच्या दुकानातील उर्वरित दागिने दररोज रात्री तपासतात. दिवसभरात किती दागिने विकले गेले, किती शिल्लक आहेत, याबाबतची माहिती घेत असतात. १२ नोव्हेंबरलाही रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकानातील शिल्लक दागिन्यांची माहिती घेतली. मात्र, एक सोन्याचे ब्रेसलेट नसल्याचे त्यांना आढळले. काउंटरवर काम करणाऱ्या कामगाराच्या स्टॉकमध्ये ते कमी आढळले. मेहता यांनी ताबडतोब दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी संध्याकाळी सव्वापाच ते पावणे सहा वाजताच्या दरम्यान, एक महिला काउंटरवर आली होती. साडेसव्वीस हजार रुपये किंमतीचे ब्रेसलेट चोरताना ती महिला दिसून आली.

भाजपच्या युवा नेत्याचा मृतदेह कारमध्ये आढळला; डालटनगंज-औरंगाबाद हायवेवरील घटना

याबाबत मेहता यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिचा शोध घेतला जात आहे.

टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्या विदेशी तरूणी; सेक्स रॅकेट चालवायच्या, असा झाला भंडाफोड

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here