हा खेळाडू नेमका आहे तरी कोण, पाहा…ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये गुणवत्ता नसेल तर तुम्ही जास्त काळ संघात राहू शकत नाही. त्याच्यामध्ये गुणवत्ता होती, पण त्याला मोठा खेळाडू होता आले नाही. हा आता ऑस्ट्रेलियाच्या संघात पुन्हा दिसणार नाही, असेही त्याच्याबाबत म्हटले गेले. पण त्याने हार मानली नाही. संघात झोकात पुनरागमन केले आणि फायनलमध्ये सर्वाधिक धावा करत त्याने आपली निवड योग्य असल्याचे दाखवून दिले. हा खेळाडू आहे धडाकेबाज फलंदाजम मिचेल मार्श. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मिचेलने २०११ साली पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ७५ धावा फटकावल्या होत्या आणि आतापर्यंत त्याच त्याच्या सर्वाधिक धावा होता. पण १० वर्षांनी आजच्या फायनलमध्ये त्याने आपलाच विक्रम मोडीत काढला. आजच्या सामन्यात नाबाद ७७ धावा फटकावत तो मॅचविनर तर ठरलाच, पण त्याचबरोबर त्याने आपला विक्रमही मोडीत काढला.
वॉर्नर आणि मार्श यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. बोल्टने यावेळी वॉर्नरला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. वॉर्नरने यावेळी ३८ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. वॉर्नर बाद झाला असला तरी मार्शने मात्र फटकेबाजी सुरुच ठेवत आपले अर्धशतकही साकारले. मार्शने या सामन्यात ५० चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. वॉर्नरनंतर मार्शनेच ऑस्ट्रेलियाच्या संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि संघाला विश्वचषकावर आपले नाव कोरून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times