द्वारे लेखक | महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अपडेट केले: 15 नोव्हेंबर 2021, सकाळी 10:12

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या असून त्यावरून वेगळीच चर्चा रंगली आहे.

संजय राऊत-नवाब मलिक

संजय राऊत – नवाब मलिक

हायलाइट्स:

  • शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस
  • नवाब मलिक यांनी दिल्या हटके शुभेच्छा
  • नवाब मलिक यांच्या ट्वीटमुळं चर्चेला उधाण

मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राऊत यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. (Nawab Malik wishes संजय राऊत त्याच्या वाढदिवशी)

नवाब मलिक यांनी संजय राऊत यांना शुभेच्छा देताना एक ट्वीट केलं आहे. ‘शोले’ चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे’ या गाण्याच्या ओळी त्यांनी ट्वीट केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी एनसीबीतील कथित खंडणीखोरी व भाजप नेत्यांच्या ड्रग्ज पेडलरशी असलेल्या संबंधांविरोधात आघाडी उघडली आहे. विरोधकांची पोलखोल करताना व त्यांच्यावर टीका करताना ते सातत्यानं शेरोशायरीचा आधार घेताना दिसत आहेत. राऊत यांना शुभेच्छा देतानाही त्यांचा हाच शायराना अंदाज दिसून आला आहे. त्यांच्या या सूचक ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटला अनेक अर्थ आहेत. मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात सुरू केलेल्या लढाईत त्यांना संजय राऊत यांचीही साथ लाभत आहे. त्यामुळं हे दोन्ही नेते अधिक जवळ आले आहेत. त्याचं प्रतिबिंब मलिक यांच्या ट्वीटमध्ये पडलं आहे. त्याशिवाय, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून हे सरकार कोणत्याही क्षणी पडेल, अशी भाकीतं विरोधी पक्ष भाजपकडून वर्तवली जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असं सांगताना मलिक यांनी सरकार पडणार नसल्याचंही अप्रत्यक्षपणे सूचित केलं आहे.

हेही वाचा:

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here