धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा येथे चोरट्यांनी स्टेट बँकेच्या एटीएम वर डल्ला मारला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे चोरीची ही घटना तिसऱ्या दिवशी उघडकीस आली. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी लेझर मशिनच्या साह्याने एटीएम मधील ३६ लाख ८६ हजार रुपयांची रोकड लांबवली.
चोरट्यांनी पोबारा करण्यापूर्वी एटीएम मशीनचे शटर बंद केले. शटर बंद असल्याने ग्राहकांना एटीएम मशीन खराब असल्याचं जाणवले. त्याबाबत बँकेकडे तक्रार करण्यात आली. तिसऱ्या दिवशी मशीन दुरुस्तीसाठी कारागीर आल्यावर ही चोरी घटना समोर आली. सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांना हे धाडस करणे शक्य झाले. शिंदखेडा पोलिस ठाण्यांमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज च्या साह्याने पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. शिवसेना-भाजप युती पुन्हा व्हावी, अशी विक्रम गोखलेंची इच्छा; भाजप म्हणतो… चोरट्यांनी हे एटीएम मशिन फोडण्याचा पूर्वी एका सीसीटीव्ही कॅमेरा वरती स्प्रे फवारला तर, अन्य दोघा कॅमेराची दिशा बदलली. आलारामची वायर ही कट करण्यात आल्याचं निदर्शनास आले. छोट्याशा शहरात एवढी धाडसी चोरी होत असताना, हा प्रकार तिसऱ्या दिवशी उघड झाला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामागे कोणाचे दुर्लक्ष नेमके कारणीभूत आहे, याचा शोध लावण्याची मागणी केली जात आहे.