वामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १५ ते १८ नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, कोकण, मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाड्यात पाऊस होऊ शकतो. तर काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरच्या आसपास पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर तापमानाचा पारा रविवारप्रमाणेच चढा राहील. सोमवारीही कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. किमान तापमानातही २० नोव्हेंबरपर्यंत घट अपेक्षित नाही.
पावसाची शक्यता
उद्या, मंगळवार ते गुरुवारपर्यंत मुंबईत दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बुधवारी पूर्व मध्य अरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. गुरुवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र संलग्न मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. रविवारीही राज्यात काही ठिकाणी पावसाने उपस्थिती लावली.
ढगाळ वातावरणामुळे द्राक्षाला फटका, बागायतदार चिंतेत
हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तवल्यानं आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.या ढगाळ वातावरणाने तरकारी पिके त्याचबरोबर पालेभाज्यांवर विविध रोगांचे संक्रमण होणार आहे..तसेच बारामती इंदापूर तालुक्यामध्ये द्राक्षाचे उत्पादन देखील मोठया प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाच्या बागा ही या दोन्ही तालुक्यांमध्ये जास्त प्रमाणात आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times