हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
  • ‘दलितांसोबत बसून चहा-जेवण घ्या… आणि मग मतं मागा’
  • मागासवर्गीयांना सांगा, ‘जातिवादा’वर नाही ‘राष्ट्रवादा’च्या आधारावर मतदान करा

नवी दिल्ली : लवकरच जाहीर होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या तयारीसाठी सत्ताधारी भाजपनं जोरदार कंबर कसलीय. या निवडणुकीत ‘हिंदुत्वा’सोबतच ‘मागासवर्गीयांचा’ही मुद्दा भाजपनं उचलून धरलाय. मागासवर्गीय जाती-जमातीतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या युक्त्या आखण्यात येत आहेत. याबद्दल कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही टीप्सही दिल्या आहेत.

रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘ओबीसी सामाजिक प्रतिनिधि संमेलन‘ आणि ‘वैश्य व्यापारी संमेलना’त ते बोलत होते. दलित, मागासवर्गीयांकडे जाऊन त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला स्वतंत्र देव सिंह यांनी दिला आहे. ‘दलितांसोबत बसून चहा-जेवण घ्या… आणि मग मतं मागा’ असं त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं.

आगामी विधानसभा निवडणुकीत ‘जातीवादा’च्या नाही तर ‘राष्ट्रवादा’च्या मुद्यावर मतदान करण्याचं आवाहन दलित आणि मागासवर्गीयांना करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.

आदिवासी गौरव दिन : बिरसा मुंडांच्या स्मरणार्थ संग्रहालयाचं मोदींकडून उद्घाटन
Modi in MP: मोदींची ‘उंची’ बिरसा मुंडांहून अधिक?, भाजपच्या होर्डिंगबाजीवर काँग्रेसचा निशाणा
‘तुमच्या नजिक राहणाऱ्या १०० दलितांच्या घरी जाऊन चहा घ्या… आणि त्यांना समजावून सांगा मतदान जातीच्या, पैशाच्या किंवा प्रादेशिकतेच्या आधारावर होत नाही… तर मतदान राष्ट्रवादाच्या नावावर होतं’, असं स्वतंत्र देव सिंह यांचं म्हणणं आहे.

‘दलित, शोषित आणि वंचितांच्या कमीत कमी हजार घरांत जाऊन एक चहा जरूर घ्या. जर त्यांनी तुम्हाला चहा विचारला तर याचा अर्थ आहे, त्यांच्या मनात तुमची प्रतिमा उजळ आहे. चहासोबत त्यांनी तुम्हाला जेवण्याचाही आग्रह केला तर हे कुटुंब भाजपशी जोडलं गेलेलं आहे, हे स्पष्ट होतं’ असा अर्थही स्वतंत्र देव सिंह यांनी भाजप कार्यकर्त्यांना समजावून सांगितला.

जर तुम्ही एखाद्या घरी जाता आणि तिथं तुम्हाला चहाही विचारला जात नसेल तसचं तिथून निघून जाण्यसाठी सांगितलं जात असेल तर १० वेळा जाऊन तिथं चहा पिण्यासाठी प्रयत्न करत राहा. तुम्हाला हजार वेळाही जावं लागू शकतं. तुमच्या दौऱ्यामुळेच पक्ष मजबूत व्हायला मदत होईल आणि तुम्हीही मोठे नेते बनाल, असं पुढारीपणाचं सूत्रंही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना समजावून सांगितलंय.

२०२२ मध्ये श्रीरामासाठी भाजपचं सरकार सत्तेत येणार आहे. अयोध्येत राम मंदिराचं निर्माण पूर्ण करायचं आहे यासाठी कठोर परिश्रम करायचे आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात राज्यातील गुंडगिरी संपुष्टात आलीय. राज्यात रोजगाराच्या आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्यानं विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. उत्तर प्रदेशची ओळख बदलत आहे. राज्यातील २३ कोटी जनतेला सुरक्षित असल्याची जाणीव होत आहे, असंही स्वतंत्र देव सिंह यांनी यावेळी म्हटलं.

Modi Ministers: मोदी मंत्रिमंडळाचं आठ वेगवेगळ्या गटांत विभाजन, पाहा कशासाठी हा खटाटोप…
Babasaheb Purandare Death: ‘शिवशाहीर’ पुरंदरेंच्या निधनानं पंतप्रधान मोदीही हळहळले

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here