जेव्हा मस्क यांनी कंपनीतील आपला १० टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना समर्थन दिले. ३५ लाखांहून अधिक मतांपैकी सुमारे ५८ टक्के लोकांनी त्यांना स्टॉक विकण्यास सांगितले.
६.९ अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स विकले
टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी आतापर्यंत ६.९ अब्ज डॉलर किमतीचे इलेक्ट्रिक कारचे शेअर्स विकले आहेत. मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती २८५ अब्ज डॉलर आहे. ३०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारे ते जगातील आणि इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. मस्क यांच्या संपत्तीत ८.०७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. २०२१ मध्ये आतापर्यंत त्यांची संपत्ती ११६ अब्ज डॉलरने वाढली आहे.
मस्क यांची बहुतेक संपत्ती टेस्लाच्या शेअर्समध्ये आहे, ज्यामुळे त्यांना रोखीने पगार मिळत नाही. ३०० अब्ज डॉलर संपत्तीचा मालक असलेल्या मस्क यांनी सांगितले की, त्यांनी स्टॉक विकण्याचा प्रस्ताव दिला, कारण काही डेमोक्रॅट अब्जाधीशांवर कर भरण्यासाठी दबाव टाकत आहेत. अनरियलाइज्ड गेन (अवास्तव लाभ) ज्याला अब्जाधीश कर म्हणूनही ओळखले जाते, त्याला जो बिडेन यांच्या बजेटमधून वगळण्यात आले होते, त्यावर सध्या वाटाघाटी सुरू आहेत.
शेअर्स १५ टक्क्यांहून अधिक घसरले
शेअर विक्रीच्या बातम्यांमुळे टेस्लाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. टेस्लाचा स्टॉक एका आठवड्यात १५.४ टक्क्यांनी घसरला आहे. शेवटच्या व्यापारात टेस्लाचा शेअर २.८ टक्क्यांनी घसरला आणि १०३३.४२ डॉलरवर बंद झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times