लातूर : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालल्याने प्रदूषण वाढते आहे. वाहन ही एक गरजेची वस्तू बनली आहे. वाहनांचा अधिक वापर हा पर्यावरणास हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या हातात जेवढे आहे तितक्या प्रमाणात तरी मानवाने वाहनांचा, इंधनाचा वापर कमी करणे आवश्यक आहे. यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने एक अभिनव उपक्रम हाती घेऊन सिग्नलवर थांबत असताना आपली वाहने बंद करावीत. यामुळे प्रदूषण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असं आवाहन वाहनधारकांना करत आहेत

मोठ्या शहरात वाहनांची संख्या मोठी आहे यामुळे चौकाचौकात सिग्नलवर वाहने थांबली जातात याच दरम्यान ३० सेकंद आपण वाहन बंद केलो तर नक्कीच काही प्रमाणात प्रदूषण नियंत्रनात राहण्यास मदत होईल ही गोष्ट जरी छोटी वाटत असली तरी लाखमोलाची नक्कीच आहे, असे आवाहन करीत लातुर येथील चौकाचौकात थांबून हातात फलक घेऊन वसुंधरा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जनजागृती करत आहेत.

दुचाकी, चारचाकी तसेच इतर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहनांचा आणि इंधनाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्या कारणाने प्रदूषण होत असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. एकीकडे वाढती लोकसंख्या आणि दुसरीकडे बेसुमार होत चाललेली वृक्षतोड यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. यातच वाहनांतून निघणारा धूर हवेत मिसळून प्रदूषण होते.

फेसबुकवरून फोटो डाऊनलोड करून तयार केली अश्लील व्हिडिओ क्लिप, नंतर आरोपीने केलं भयंकर कृत्य
यामुळे शक्य तितका वाहनांचा वापर कमी करणे ही काळाची गरज आहे. बरेच वाहनधारक सिग्नलवर थांबल्यास देखील आपली वाहने चालूच ठेवतात. शिवाय, एक्सलेटर जोरात करून प्रदूषण करतात. मात्र २० ते ३० सेकंद सिग्नलवर थांबल्यानंतर आपली वाहने बंद केल्यास यातून मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत आणि पर्यावरणाची होणारी हानी आपण थांबवू शकतो. यावर जनजागृती करण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने उपक्रम हाती घेत लातुरातील सिग्नल असलेल्या मुख्य चौकात थांबून सिग्नलवर थांबल्यानंतर आपली वाहने बंद करा यासाठी जनजागृती करण्यात आली. हातात लक्षवेधी फलक घेत हा उपक्रम राबविण्यात आला. अनेकांनी याला प्रतिसाद देत सिग्नलवर थांबल्यानंतर आपली वाहने सिग्नल जोपर्यंत आहे तोवर बंद केली.

या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, कार्याध्यक्ष अमोलआप्पा स्वामी, राजेश खंडेलवाल, सौदागर नूर यांनी सहभाग नोंदवत जनजागृती केली.

Breaking: एसटी संपाचा तिढा कायम; हायकोर्टानं दिला ‘हा’ अंतरिम आदेश

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here